ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार करणार नाही …स्वातंत्र्यदिनी घेतली विद्यार्थ्यांनी शपथ”

१५ ,ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या रोजी, १ ली ते १२ च्या, शालेय विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरुकता, अनुषंगाने घ्यावयाची शपथ….

मी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनमानाची गुणवत्ता वाढविणाऱ्या आणि त्यांना स्वतंत्रपणे आणि सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करणाऱ्या संशोधने आणि सेवा मिळविण्यात, त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाने जगण्यासाठी मदत करण्याचे वचन देतो, मी गैरवापर करण्यास नकार देतो.

वरील “शासकीय शपथ” मसुदा, महाराष्ट्रांतील सर्व शाळेत, शासनामार्फत राबविण्यात येणार आहे,
आपापल्या कार्यक्षेत्रात व गाव पातळीवर, प्रत्येक शाळेमध्ये पोहोचवण्याचे काम करण्याकरिता आपण, आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत ही सहभागी होऊ या…

फेस्कॉम चे अध्यक्ष माननीय डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांचे सूचनेवरून सर्व प्रादेशिक फेस्कॉम प्रादेशिक विभागा करता रवाना.

सुरेश पवार
प्रवक्ता-प्रसिद्धी प्रमुख फेस्कॉम‌ महाराष्ट्र
०३ऑगस्ट २०२५

https://youtu.be/o6ELzkqdEBM?si=K23EY1p6acMnIVhl