ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न, प्रशांत दामलेंचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार.

नवी मुंबई (वा.) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई प्रादेशिक विभागाचे आठवे द्वैवार्षिक अधिवेशन ७ नोवोंबर रोजी विष्णुदास भावे नाट्‌यगृह, वाशी येथे कार्यक्रमाचे उद्‌घाटक वनमंत्री गणेश नाईक, अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, पदसिध्द आजीवन अध्यक्ष दिगंबर चापके, माजी अध्यक्ष अरुण रोडे, मुंबई विभागाध्यक्ष सुरेश पोटे यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनेते प्रशांत दामले यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी परिपूर्ण शहर आहे. नवी मुंबईत ज्येष्ठट्रांसाठी अनेक विरंगुळा केंद्र आणि नवी मुंबई महानगरपालिकेत ज्येष्ठांसाठी एक कक्ष आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या बाबतीत हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. मुलांनी ज्येष्ठ व्यक्तींना त्रास देऊ नये, त्यांचा सांभाळ करणे, आजची मुले उद्याचे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठांच्या हिंसाचाराच्या विषयावरती उत्तम नाटक प्रशांत दामले यांनी घेऊन याचे त्यांना जे काही सहकार्य पाहिजे ते आम्ही देणार, असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले. ज्येष्ठ व्यक्तीने उर्वरित जीवनात शांत राहावे, ध्यान करावे, छंद जोपासावेत, आनंदी रहावे, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केले.