‘उर्वरित जीवनात ज्येष्ठांनी आनंदी राहावे’

ज्येष्ठ व्यक्तीने उर्वरित जीवनात शांत राहावे. ध्यान करण्यासह छंद जोपासत आनंदी राहावे, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ते वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मुंबई प्रादेशिक विभागाचे आठवे द्वैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शुक्रवारी पार पडलेल्या या अधिवेशनाचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी भूषविले. ‘आज ज्येष्ठांच्या बाबतीत हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. मुलांनी ज्येष्ठ व्यक्तींना त्रास न देता त्यांचा सांभाळ करावा. आजची मुले उद्याचे ज्येष्ठ नागरिक आहेत. याचे भान त्यांनी ठेवावे, असे गणेश नाईक यांनी सांगितले.

प्रशांत दामले यांचा सल्ला

नवी मुंबई हे ज्येष्ठ नागरिकांना परिपूर्ण असे शहर आहे. नवी मुंबईत ज्येष्ठांसाठी अनेक विरंगुळा केंद्र आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेत ज्येष्ठांसाठी एक कक्ष आहे, अशी माहिती पावेली टेकाळे यांनी दिली. माधववागचे डॉ मिलिंद सरदार यांनी मोष्ठ नागरिकांनी आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी सखोल माहिती दिली याप्रसंगी आईल्कान’चे अध्यक्ष दिगंबर चापके, फेस्कॉमचे माजी अध्यक्ष अरुण रोडे, कार्यकारणी सदस्य व महाराष्ट्रातील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुंबई विभाग फेस्कॉमचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी देशपांडे यांनी केले, अधिवेशन पार पडण्यासाठी शरद डिचोलकर, प्रतिभा सराफ, स्वाती फडके, लता पोवार, श्रीराम शिवडेकर, दिलीप गाडेकर, दिलीप धारकर, बळवंत पाटील यांनी सहकार्य केले.