सिल्व्हर ईनिंग जेष्ठ नागरिक महिला मंडळ

सिल्व्हर ईनिंग जेष्ठ नागरिक महिला मंडळ “ हिंगणघाट च्या वतीने काल दि. १५-६-२५ रोजी “जेष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिवस” साजरा करण्यात आला. हा दिवस आमच्या सर्व सहकारी भगिनींनी “प्रेममंदिर वृद्धाश्रम” येथे वृद्ध व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या.वृद्ध व्यक्तींना खाऊ व कपडे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.