यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी मोठे नैसर्गिक संकट कोसळले असून शासन आपल्या परीने त्यांना योग्य ती मदत देत आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या संकटसमयी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील मदतीचा हात पुढे करून राज्यातून जवळपास १५.५९ लाखांचा निधी संकलित केला आहे. या निधीचा चेक दिनांक १५/१२/२५ रक्कम रुपये १५.५९ लाख आज आपणाकडे सुपूर्द करीत आहोत. राज्यातील जवळपास १.५ कोटी ज्येष्ठ नागरिक सदैव आपल्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

