श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगाव वारुळवाडी तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असते .दिनांक १४ /२/२६ रोजी मोफत आरोग्य शिबीर , ज्येष्ठांचे वाढदिवस , परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप , अपंगांना आवश्यक विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप केले जाते . ज्येष्ठ नागरिक संघ , कोते परिवार व औटी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदवाडी ( वारुळवाडी ) येथील १४० विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्टिलच्या बाॅटलचे वाटप करण्यात आले . सदर प्रसंगी सभेचे आयोजन करण्यात आले .सौ . मनिषा कुर्हाडे यांनी सुत्रसंचलन केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . नंदा औटी यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी या शाळेत सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील विविध भाषिक आहेत हे आवर्जून सांगितले . अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री रमेश पाटे हे होते . सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बाॅटलचे वाटप करण्यात आले. बाॅटल पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे उल्हासित दिसत होते . कार्यक्रमास वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मा . श्री विनायक भुजबळ उपस्थित होते . त्यांनी देणगी देणाऱ्यांचे अभिनंदन केले आणि संघाच्या कार्याची प्रशंसा केली. अध्यक्ष रमेश पाटे , सचिव परशुराम कोते , विठ्ठलराव औटी यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमास संघाचे संचालक शिवाजीराव गायकवाड , विलास पाटे , बापुराव डोके , सुरेंद्र कोर्हाळे , विजय शिंदे , सुहास ब्रह्मे , अशोक औटी. सुदाम खेबडे , तुकाराम वामन , शंकर चवरे , रत्नाकर सुबंध , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पठाण , उपाध्यक्ष सौ . चौधरी हे उपस्थित होते . शाळेतील सर्वच शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .

