शिवजन्मभूमी जुन्नर येथील वडगाव आनंद च्या जय मल्हार जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला

शिवजन्मभूमी जुन्नर येथील वडगाव आनंद च्या जय मल्हार जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संघाचे खजिनदार चंद्रकांत शेठ देवकर यांचा 75 वा गौरव समारंभ तसेच अनेक ज्येष्ठांचे वाढदिवस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच जय मल्हार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष यांच्या ही हस्ते सत्कार करून उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे यांनी भूषविले, आमदार शरद दादा सोनवणे यांनी सर्व ज्येष्ठांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा एकनाथ डोंगरे सचिव श्री नामदेव दिघे सर तसेच ओतूर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ,सचिव, सहसचिव ,माजी अध्यक्ष यांच्यासह शिवनेरी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष आणि तालुक्यातील बहुतेक संघाचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. पिंपळवंडी संघाचे सचिव श्री येंधे व मार्गदर्शक श्री वाकचौरे उपस्थित होते . जय मल्हार जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांनी प्रास्ताविकात संघाच्या कामकाजाचा आढावा सादर केला, तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव देवकर यांचाही कृतज्ञतापूर्वक आवर्जून उल्लेख केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण कार्यकर्ते श्री चौगुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार जय मल्हार जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष हरिभाऊ देवकर यांनी मानले.