इचलकरंजी दिनांक 03/05/2025.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, प्रादेशिक विभाग कोल्हापूर अंतर्गत इचलकरंजी शहर समन्वय समितीच्या वतीने
इचलकरंजी येथे माननीय आमदार राहुल जी आवाडे यांना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून, मागण्या पूर्ण करण्याबाबत विनंती करतो असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी इचलकरंजी शहर समन्वय समितीचे अध्यक्ष रवींद्र सौंदत्तीकर. सचिव वझे, उपाध्यक्ष विठ्ठलराव डाके, कस्तुरे साहेब, वैशाली ताई नाईकवडी मॅडम. शहर समन्वय समितीचे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

