.
मनोहारी पुनरागमन
आयुष्याच्या धकाधकीच्या जीवनात काही गोष्टी मागे पडतात, काही शब्द स्तब्ध राहतात, काही पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, काहींना मागे रहावेच लागते, मागे राहूनही ते पुनश्च झपाट्याने पुढे जातात, असेच काहीसे जीवन प्रत्येकाचे असते, यालाच “जीवन ऐसे नाव” म्हणून संबोधले जाते…
आता हेच बघा ना आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाशी निगडित झालेले,आपले मुखपत्र “मनोहारी मनोयुवा” काही कारणास्तव दोन महिने बंद ठेवावे लागले, नुसते सुने-सुने वाटत होते, निराश होऊन आपण दर महिन्याला त्याची चातकासारखी त्याची वाट पहात होतो…
आता ही हुरहूर लवकर च संपणार आहे, नव्या दिमाखात, नव चैतन्याने बहरलेला, नव्या उमेदीच्या कार्यकारिणीच्या, नाविन्यपूर्ण कल्पनांच्या, संकल्पनेतून साकारलेला “मनोहारी मनोयुवा” हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्वरूपात…
*मनोहारी पुनरागमनास*
उत्साहाने सज्ज झाला आहे,
“भेटी लागी जीवा लागली से आस”
“आषाढस्य प्रथम दिवसे” पासूनच वारकऱ्यांना जशी पंढरी च्या पांडुरंगाच्या भेटीची जीवाला आस लागते, ती आषाढीला पुरी होते, आपल्या नेरूळ पंढरीच्या आम्हा ज्येष्ठ वारकऱ्यांची मनोहारी मनोयुवा ची आस ही जुलै २०२५ मध्ये पुरी होणार आहे…
याचं बहुतांशी श्रेय, ज्येष्ठ उत्क्रांती चा विडा उचललेल्या, 24 x 7 कार्यमग्न असलेल्या, आपले धडपड्या स्वभावाच्या अध्यक्षांना, “डॉ.अण्णासाहेब टेकाळे” व आपल्या ध्येयवादी टीम चे आहे, हाती घ्याल ते तडीस न्या, या जीद्दीने पछाडलेलेच अशक्याचे शक्य करून दाखवितात, घडवितात…इती…
मनोहरी मनो युवा मासिक पुन्हा दरमहा मोठ्या जोमाने सुरू होणार हे आतापर्यंत आपल्या सर्वांना माहीत झाले आहेच.अंक लवकरच प्रकाशित होऊन आपल्या पर्यंत पोहचणार आहे.
नव्या व्यवस्थेत सर्व प्रादेशिक विभाग दर महा आपले कार्यवृतंतांत पाठवू शकणार आहेत.प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी अंकात एक पान राहणार आहे.
प्रत्येक प्रादेशिक विभागाला प्रत्येक महिन्यात जास्तीचे अंकही देण्यात येणार आहेत.
आता प्रादेशिक विभागाची या बाबतची जबाबदारी वाढली आहे.
प्रत्येक प्रादेशिक विभागानि किमान शंभर सभासद करावयाचे आहेत.
विशेषकरून प्रत्येक प्रादेशिक विभागांनी त्यांच्या कार्यकारिणी सदस्य पदाधीकाऱ्यांना सदस्यत्व अनिवार्य करावे लागेल.त्या प्रमाणे आपले अहवालही पाठवावेत.
समन्वय समितीच्या सदस्यांना सदस्यस्वत्व अनिवार्य करावे लागणार आहे.
प्रादेशिक विभागाच्या अध्यक्ष ,सचिवांनी या कामी आज पासून पुढाकार घ्यावा असे नम्र आवाहन करीत आहे.
मनोहरी मनो युवा मासिक बँक खाते न.लवकरच कळवण्यात येईल.
FESCOM अध्यक्ष मा श्री आण्णासाहेब टेकाळे यांच्या अथक परिश्रमातून,प्रयत्नातून मनोहरी मनो युवा मासिक अंक सुरू होत आहे त्यास आपण सर्वांनी भरघोस पाठिंबा देऊन अध्यक्षांचे हात बळकट करायला पाहिजे.
धन्यवाद.
अशोक तेरकर
उपाध्यक्ष FESCOM
सदस्य, मनोहरी मनो युवा कौन्सिल.
शब्दांकन- -सुरेश पवार
२८-०६-२०२५
