प्रति,
सर्व प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष/सचिव, समन्वय समित्या,आणि आरोग्य समितीचे पदाधिकारी
महोदय,
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की निरोगी आरोग्यदायी जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढचे पाऊल आरोग्यम् हृदयसंपदा ही चळवळ हृदयाचे सुदृढ आरोग्य ठेवण्या साठी आपल्या हृदयाची कार्यक्षमता तपासणी (स्ट्रेस टेस्ट) मोहीम फेस्कॉम आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा हाती घेतली आहे.
या चळवळीची अंतर्गत हृदयाचे आरोग्य कसे आहे ही सांगणारी स्ट्रेस टेस्ट तपासणी तुमच्या जवळच्या माधवबागच्या क्लिनिक किंवा माधगबागच्या हॉस्पिटल मध्ये मोफत करून डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे,आणि त्यावरील जीवन शैलीतले बदल, उपाय समजुन घेणे,जेणेकरून ज्येष्ठांच्या वाढता हृदयरोगाला आळा घालणं सोपे जाईल.
ही आरोग्य मोहीम सर्व जेष्ठ नागरिक संघ,सभासदा पर्यंत पोहचवणे ही आपली जबाबदारी आहे.
या तपासणी साठी आपण 02048552566 या नंबर वर मिस कॉल करावा, तुम्हाला पुढील अपॉइंटमेंट मिळेल.
तरी ही चळवळ सर्व ज्येष्ठांपर्यंत पोचवण्यासाठी आपण झूम मिटींग घेऊन तळागाळापर्यंत ही मोहीम पोहचवता येईल,या उद्देशाने १५/१२/२५ रोजी सकाळी दु. ४ वाजता आपण सर्वांनी हजर राहून हे समजून घेऊन आपापल्या संघ आणि सभासदापर्यंत ही माहिती पोहचवावी,आणि अशा अजून झूम मिटींग घेऊन ही चळवळ जास्तीत जास्त ज्येष्ठांपर्यंत पोहोचू या.
तसेच काही शंका असतील तर
श्री. मिलिंद ग.सरदार- माधवबाग (फेस्कॉम हेल्थ समिती प्रमुख) यांना 7350455550 संपर्क करावा. ही विनंती.
फेस्कॉम आणि माधवबाग
आपले विनीत,
अण्णासाहेब टेकाळे – अध्यक्ष
चंद्रकांत महामुनी – मुख्य सचिव
(फेस्कॉम महाराष्ट्र)

