ध्येयवेड्या संकटमोचकाचा अभिमानास्पद सन्मान

‌.
ध्येयवादी संकटमोचक

काही ध्येयवादी असतात, काही हे ध्येयवेडे असतात, असेच काही कार्याला वाहून घेणारे आणि त्याकरता ध्यास घेतलेले, अनेक जण आपले उद्दिष्ट, आपले ध्येय, गांठण्यासाठी करता सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात, त्याकरता आपले जीवन कार्याला पूर्णतः वाहून घेतात आणि कार्याशी एकरूप होतात…

त्यापैकीच एक नाव म्हणजे आपले संकटमोचक, फेस्कॉमचे अध्यक्ष, माननीय, “डॉ.अण्णासाहेब साहेब टेकाळे” 24×7 ज्येष्ठ नागरिक उत्थानासाठी स्वतः चे उर्वरित जीवन वाहून घेतलेले एक ध्येयवेडे अनोखे व्यक्तिमत्व…
त्यांच्या उर्वरित जीवनतत्त्वाशी त्यांनी स्वतःला बांधून घेतलेले आहे, एक परमोच्च ध्येय, एक ध्यास…

संकटमोचकाचा एकच ध्यास
ज्येष्ठांना मिळावा सुखाचा घास

म्हणून ह्या अवलिया ची रात्रंदिवस धडपड चालूच असते, आपल्या प्रयत्नांना कधीतरी गोमटी फळे लागतील असा त्यांना पूर्ण विश्वास असतो व आहे, ही त्यांची कामगिरी “गरुड झेप” या सत्रात मोजावी अशीच उज्वल आहे, व पूर्णत्वाच्या जवळपास पोहोचलेली आहे…

चार जुलै रोजी ४ वाजता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, साहेब यांच्याबरोबर, विधान भवनात, उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात, ज्येष्ठ नागरिकांच्या, १७/५/२०२३ व २९/४/२०२४ च्या, सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या निर्णयानुसार मिटींगच्या, कामाचा पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे…

हीच आपल्या संकटमोचकांच्या कार्यबाहुल्याची पोहोच पावतीच आहे…

“कर्तृत्वाशी गगन ठेंगणे” ” sky is the limit” या वाक्याची प्रचिती आपल्याला आता येत आहे… सर्व ज्येष्ठ नागरिकांना अभिमानास्पद, असे आमंत्रण मिळाले आहे… अध्यक्षासह महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे अभिनंदन करीत, संकटमोचकांना सुयश व शुभेच्छा देत, लेखणीला विराम देतो…

*सुरेश पवार*
*०४/०७/२०२५*

,