
एक अजरामर व्यक्तिमत्व
सौ. तेजस्विनी अधिकारी
“आज म्या ब्रम्ह पाहिले”
असा अनुभव म्हणजे आमचे बाबा.
डॉ. शं. पां किंजवडेकर
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’
ही उक्ती त्यांना आदर्शवत मानणा-या त्यांच्या बाबतीत प्रत्येकालाच मान्य असावी.
वैयक्तिक जीवनात व सामाजिक जीवनात त्यांनी कधीच तफावत केली नाही. अंगी बाणलेले सर्वोत्तम अत्युच्य असे गुण त्यांनी आयुष्यभर जपले व वर्तनात कधीही बदल केला नाही. आमच्या बालपणापासुन बाबांचे एक कपाट होते व आजही त्यांचे तेच कपाट आहे. राहणीमान अत्यंत साधे व जे ते उत्तम, उदात्त त्यांच्या विषयी कमालीचे आकर्षण असणा-या बाबांनी आज ज्याला लक्झरियस् लाईफ म्हणावे असे जीवन आम्ही जन्मापासुन अनुभवले. पुस्तके, नातेवाईक व मित्रपरिवार हे आमच्या लहानपणाचे महत्वाचे बिंदू होते. नवनवीन मशिन्स टी.व्ही., टेपरेकॉर्डर, फ्रिज, मिक्सर, शिलाई मशीन, गाडी, स्कुटर, फोन असे सर्व सोयीनी युक्त असे आमचे घर होते. पण ते सर्वासाठी होते. आमच्या घरी बिल्डिंग मधील तसेच कॉलनीतील कोणाचाही फोन आला तरी आम्ही त्यांना बोलवायला जात असू. आहे ते सर्वाबरोबर वाटून घ्यावे असेच आम्हाला सांगितले गेले. काटकसर, शिस्त, नियमितपणा, वेळेचे नियोजन, वक्तृत्व, सभाधीटपणा, नेतृत्व या सर्वांचे बाळकडू आम्हाला मिळत गेले. बाबांच्या वागण्यातून, बोलण्यातून त्यांचा अभ्यास सतत कामात गर्क राहण्याचे त्यांचे व्यक्तिमत्व घरात व घराबाहेर पेशंट, डॉक्टरर्स सर्वांशी स्मीत, शांतपणे बोलणाऱ्या बाबांनी आम्हावर त्या सर्वाचा कमालीचा परिणाम केला.
त्यांच्या स्वावलंबनाचा आत्मविश्वासाचा, वक्तृत्वाचा “या सम हाच” हीच एक उक्ती लागू पडते. गेल्या चार वर्षात त्यांच्या तब्येतीमुळे कामाचा व्याप कमी केला होता. पण तरीही रोज विद्या भवनात शाळेत जाण्याचा शिरस्ता त्यांनी मोडला नाही.
अपवादत्मक आम्ही बाबांना कधीही टंगळ मंगळ करत, कोणाची थट्टा करत, एखाद्या गोष्टीबद्दल खत व्यक्त करत बसलेले कधीही पाहिले नाही. मिताहारी मितभाषी व सस्मित बोलणे, प्रवास, लोकांच्या अविरत भेटी ही त्यांची जीवनाची अविभाज्य अंगे होती. निर्भिडपणे कोणताही स्वार्थी हेतु न ठेवता ते आपल्या कामात व ठरवलेल्या लक्षाच्या दिशेने जात राहत. त्यांचे बोलणे अत्यंत लाघवी होते, गेल्या २५ वर्षात त्यांनी स्वतःच्या पर्सनालिटी मध्ये अनेक बदल केले व काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे ते लवचिकपणे वागत राहिले, कोणत्याही मुल्यांना कॉम्प्रमाईज न करता हे सर्वात कौतूकास्पद. मला आठवताहेत अनेक असे प्रसंग, २०१८ मध्ये त्यांचा जेव्हा सरसंघचालक मा. श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते नागपूर येथील रेशमबाग मध्ये सत्कार करण्यात आला तेव्हा सभागृह पूर्ण भरलेले होते. अनेक मान्यवर (गोव्याचे सद्य मुख्यमंत्रीही) उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना बाबांनी सविनय व अतिशय कणखरपणे ज्येष्ठांचे आजचे बिकट प्रश्न मांडत सरकारने त्यावर उपाय योजना करण्यासाठी ठामपणे मतप्रदर्शन केले. संपूर्ण सभागृह स्तिमित होऊन केवळ ऐकत होते, त्यानंतर त्या दोन अडीच हजार लोकांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
मैत्र – अजातशत्रु व सर्वांचे मैत्र असेच बाबांचे वर्णन होऊ शकते
नेतृत्व – या जगात नेते कभी व फॉलोअर्स जास्त असेच चित्र सर्वत्र दिसते त्यांचे महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या जन सामान्यांना रोजचे जीवन जगताना असामान्याचे वजन पेलवणे झेपण्या सारखे नसते. The difference between ordinary and extra ordinary to that extra’ Vo extra’ बाबांकडे रोमा रोमामध्ये बसलेले होते. त्यांच्यातील असामान्य गुणांची वय, काळ व प्रसंग अशा कोणत्याही गोष्टीनी चढती कमानच होत राहिली.
प्रत्येक व्यक्तिला त्यांच्यातील या गुणांची चमक परिसस्पर्शी प्रमाणे मासली त्यांच्या सहवासातील प्रत्येकाला ऊर्जा देवून गेली
अशा आमच्या बाबांचा जीवन लौकीक, दैदिप्यमान, अव्दितीय व नेत्रदिपक, दिव्य असरा जीवनप्रवास अचानकपणे अकसिप्तरित्या संपेल असे कोणालाही कधीच वाटले नसावे ही तो देवात्रीची मर्जी ।।
त्यांचे कार्य व त्यांच्यातील त्याग ह्यांचा वारसा पुढे चालवणे हिच त्यांना प्रेमपुर्ण श्रद्धाजंली असेल
