दि. २१ जानेवारी २०२६ रोजी जेष्ठ नगारिक संघ बेस्ट नगर गोरेगांव (प.), या संघाने त्यांचा २२ वा वर्धापनदिन सोहळा बेस्ट नगर गणेश मंच येथे सभासदांच्या मोठ्या उपस्थितित साजरा केला. या सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री अण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष फेस्कॉम उपस्थितित होते तसेच श्री. सुरेश पोटे अध्यक्ष फेस्कॉम मुंबई विभाग हे देखिल उपस्थित होते.
संघातिल सदस्यांचा करमणुकीच्या कार्यक्रमाने सोहळयाला सुरूवात झाली. वर्धापनदिनाच्या मुख्य कार्यक्रमाला “खरा तो एकची धर्म” या साने गुरूजींच्या प्रार्थनेने सुरूवात झाली. संघाचे कार्यवाह श्री. प्रकाश माने यांनी कार्यक्रमाला सुरूवात केली. प्रमुख पाहुणे, मान्यवार निमंत्रित यांच्या स्वागतानंतर व सत्कारानंतर संघाच्या प्रथेप्रमाणे कन्यारत्न झालेल्या दोन जोडप्यांचा कन्यारत्नासहीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विवाहाला ५० वर्षे पुर्ण झालेल्या व वयाची ७५ वर्षे पुर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. संघाचे जेष्ठतम सभासद श्री. रमाकांत सामंत (वय वर्षे ९२ वर्षे ६ महिने) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. संघाचे माजी कार्यवाह श्री. सुधाकर मालपेकर यांना त्याचा प्रदिर्घ सेवेबदद्ल “जीवन गौरव” पुस्कारने सन्मानित करण्यात आले वर्धापदिना निमित्त झालेल्या स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. नंतर सभासद देणगीदारामधून भाग्यवान क्रमांक काढून विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यानंतर श्री. अण्णासाहेब टेकाळे व सुरेश पोटे या मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाल्यानंतर संघाचे अध्याक्ष श्री. नरेश नलावडे यांचे भाषण झाले.
सोहळयांच्या अखेरीस खजिनदार सौ. स्वाती माने यांच्या आभार प्रदर्शना नतर वर्धापनदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

