“अंधत्वाकडुन दृष्टिकडे मुक्त अभियान”

“जुन २०१६ पासुन अखंड सेवा “
नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस येथे जुन २०१६ पासुन प्रत्येक महिन्यांत २० तारखेस मोफत मोतीबिंदु निदान शिबीर नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस व के.के.आय इन्स्टिटय़ूट साधुवासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते.दिनांक २० जानेवारी २०२५ सोमवार रोजी मोफत मोतीबिंदु निदान शिबीरात एकुण ६४ रूग्णांची तपासणी करून ४६ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.दिनांक:-२२ जानेवारी २०२५ बुधवार रोजी २९ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणें येथे पाठविण्यात आले.तसेंच ११ रूग्णांना अल्प दरात चष्मे वाटप कर
ण्यात आले.एकही रूग्ण हॉस्पिटलला रेफर करण्यात आला नाही.आजतागायत डिसेंबर २०२४ अखेर ७९४७ रूग्णांची तपासणी करून ५२७५ रुग्णांवर उत्तम प्रकारे .मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या.तसेंच २६५४ रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.अंधत्वाकडुुन द्रुष्टीकडे मोतीबिंदु मुक्त अभियान हा प्रकल्प राबविण्याचा संंघटनेच्या माध्यमातून मानस आहे.मोफत मोतीबिंदु निदान शिबीरात श्री.पाटील साहेब, श्री .गाढवे साहेब, श्री.नानवानी साहेब बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणें यांचे सहकार्य लाभले.सदर प्रसंगी नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटसचे संस्थापक अध्यक्ष नेत्रमित्र डाॅ.पांडुरंग श्रीपतराव लाड.व सचिव नेत्रमित्र श्री.रामचंद्र ज्ञानदेव कुंभार,महिला सदस्य श्रीमती सुनंदा चंद्रकांत जगताप, सभासद श्री.महादेव श्रीरंग शितोळे.
हे उपस्थित होते.