MEMBERSHIP / सभासदत्व
फेस्कॉमचे सभासदत्व खालील वर्गाचे राहील.
अ संघ सभासदत्व नियम ५.२ मधील व्याख्येनुसार असलेला संघ कमीतकमी २५ सभासद झाल्यावर, आणि असे कल्याणकारी उपाय योजण्यासाठी निश्चित नियम असल्यावर, स्वेच्छेने पुढे नियम ७.१ मध्ये दर्शविलेल्या प्रक्रियेद्वारा फेस्कॉमशी संलग्न होऊ शकेल, व खालील तक्त्यात दर्शविलेले प्रवेश शुल्क व वार्षिक शुल्क भरुन फेस्कॉमचा संघ सभासद होऊ शकेल. जे सभासद संघ नियमितपणे दरवर्षी ३१ मे पूर्व सभासद शुल्क भरतील ते फेस्कॉमचे नियमित सभासद समजले जातील, आणि सर्व निवडणुकांमध्ये भाग घेऊ शकतील. व्यक्तिगत सभासद, संघटनांचे प्रतिनिधी वगैरेबाबत तपशील ६.२ मध्ये नमूद केला आहे.
६.१ आ विकास निधी फेस्कॉमच्या व प्रादेशिक विभागांच्या, तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाच्या विकासासाठी विकास निधी गोळा करण्यात येईल. संघ सभासदांच्या प्रत्येक सदस्याकडून दिनांक ०१/०४/२०२१ पासून हा निधी दरसाल दर सभासदास प्रत्येकी रु. ३/- मात्र प्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाने गोळा करावा व सदरच्या निधीचे विभाजन, ज्येष्ठ नागरिक संघ पातळी, प्रादेशिक विभागीय पातळी, व मुख्यालय (केंद्रीय नियामक मंडळ) या तिनही पातळीवर सम प्रमाणांत केले जावे.
प्रवेश शुल्क व वार्षिक शुल्क दर्शविणारा तक्ता :

६.२ सहयोगी सभासदत्व : व्यक्तिगत
६.२.१ ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करण्यात रस असलेली व्यक्ती, फेस्कॉमच्या सरचिटणीसांकडे साध्या कागदावर अर्ज करून, व आजीवन शुल्क रु. १,०००/- भरुन, फेस्कॉमचा सहयोगी सभासद होऊ शकेल.
६.२.२ फेस्कॉमचा सहयोगी सभासद झाल्यावर तो / ती फेस्कॉमच्या संघ सभासदांसारखेच सर्व हक्क व विशेष हक्क मिळविण्यास पात्र राहील, मात्र कोणत्याहि हेतूसाठी मतदानाचा, फेस्कॉममध्ये कोणतेही पद धारण करण्याचा, किंवा कोणत्याही सार्वजनिक अथवा निम-सार्वजनिक संस्थेवर फेस्कॉमचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क त्यास असणार नाही.
६.३ पदसिद्ध सभासदत्व फेस्कॉमच्या पदसिद्ध सभासदत्वासाठी खालील संस्था आपल्या विवेक बुद्धीने प्रत्येकी फक्त एकाच व्यक्तिला नियुक्त करु शकतील. पदसिद्ध सभासदत्व मंडळाच्या मान्यतेनेच दिले जाईल.
६.३.१ भारत सरकारचे सामाजिक न्यय व सक्षमीकरण मंत्रालय,
६.३.२ दि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल वेलफेयर, मुंबई.
६.३.३ सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई.
६.३.४ वार्धक्यविज्ञान व वार्धक्यरोगचिकित्सा आणि पर्यायी उपचारपद्धतीची राज्यातील केन्द्रे.
६.३.५ नियामक मंडळाच्या विवेकबुद्धिनुसार अन्य संस्थां, मात्र याही बाबतीत नियम ६.२.२ मधील तत्वे लागू होतील.
६.४ सन्माननीय सभासदत्व जर फेस्कॉमच्या मते एखाद्या व्यक्तिने वयोवर्धनाच्या शास्त्रात, अथवा ज्येष्ठांशी संबंधित अन्य सामाजिक सेवेत, बहुमूल्य किंवा विशेष प्रकारचे कार्य केले असेल, व अशा प्रकारे फेस्कॉमची ध्येये व उद्दिष्टे पुढे नेण्यांत सहाय्य केले असेल, तर अशा व्यक्तिला नियामक मंडळ आपल्या विवेकबुद्धिनुसार सन्माननीय सभासदत्व बहाल करु शकेल. मात्र याही बाबतीत नियम ६.२.२ मध्ये निर्देशित तत्वे लागू होतील.
६.५ आश्रयदाता / हितचिंतक सभासदत्व नियामक मंडळ आपल्या विवेकबुद्धिनुसार फेस्कॉमला एकाचवेळी रु. १०,०००/- अथवा अधिक रकमेची देणगी देणाऱ्या व्यक्तिला आश्रयदाता सभासदत्व आणि रु. ५,०००/- वा अधिक देणगी देणाऱ्या व्यक्तिला, हितचिंतक सभासदत्व, बहाल करूं शकेल, मात्र याही बाबतीत नियम ६.२.२ मध्ये निर्देशित तत्ये लागू होतील.
७) सभासदांचा प्रवेश:
७.१ प्रवेशासाठी अर्ज सादर करणे: फेस्कॉमशी संलग्नता / प्रवेश इच्छिणाऱ्या नियम ६ मध्ये दर्शविलेल्या विविध वर्गाच्या सभासदांनी आपले संलग्रता / प्रवेश अर्ज खालील अधिकाऱ्यांना सादर करावयाचे आहेत.
अ.क्र. सभासदत्वाचा वर्ग
प्रवेशासाठी अर्ज कोणत्या अधिकाऱ्याला सादर करावयाचा
१)
संघ सभासद
संबंधित फेस्कॉम प्रादेशिक विभागाच्या विभागीय सचिवांकडे विहित नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज.
२)
सहयोगी सभासद
फेस्कॉमच्या सरचिटणीसांकडे साध्या कागदावर.
३)
पदसिद्ध सभासद
सरचिटणीस व नियम ६.३ मध्ये निर्देशित संस्थांच्या विभागा दरम्यान पत्र व्यवहाराने.
४)
सन्माननीय सभासद
५)
आश्रयदाता सभासद
कोणाला सन्माननीय सभासदत्व बहाल करावयाचे हे नियामक मंडळ
ठरवेल. तसेच फेस्कॉमला देणगी संबंधीच्या विहित शर्ती पूर्ण केल्यावर
६)
हितचिंतक सभासद
आश्रयदाता सभासदत्व किंवा हितचिंतक सभासदत्व प्रदान
करण्याबाबत निर्णय घेईल
७.२ प्रवेश देण्यास मान्यता व तसे कळविणे:
संघ सभासवाव्यतिरिक्त अन्य इच्छुक सभासद आपला अर्ज कागदावर सरचिटणीसाकडे सादर करेल जो त्याला नियामक मंडळाचा निर्णय कळयील, प्रत्येक सभासदाचे नांव लगेच पत्र व्यवहाराच्या यादीमध्ये समाविष्ट केले जाईल, व प्रत्येक सभासदला फेस्कॉमच्या सभासद नोंदवही (मेंबर्स रजिस्टर) मध्ये नोंदणी क्रमांक दिला जाईल.
८. फेस्कॉमच्या (महासंघाच्या) सभासदांचे हक्क व विशेष हक्क :
८.१ सर्व सभासदांना खालील हयक व विशेष हक्क आहेत. फेस्कॉमतर्फे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, वार्षिक अधिवेशने, स्नेह संमेलने, छोटे मेळावे, व्याख्याने, परिसंवाद, परिषदा, देखावे, प्रदर्शने आदि फेस्कॉमच्या सर्व कार्यक्रमांत भाग घेणे.
८.२. ज्येष्ठ नागरिक चळवळीशी संबंधित सर्व बाबींविषयी फेस्कॉमकडून माहिती, मदत व मार्गदर्शन मिळविले या सर्व बाबतीत आपणहून फेस्कॉमला माहिती, मदत व मार्गदर्शन प्रदान करणे.
८.३ या घटनेत अंतर्भूत विविध नियमांमध्ये स्पष्टपणे निर्देशित निर्बंधांच्या आधीन वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये, विशेष सर्वसाधारण सभांमध्ये, निवडणुकांत व अन्य प्रसंगी मतदान घेतले जाते, त्याप्रसंगी मतदान करणे.
८.४ फेस्कॉमच्या विशिष्ट क्रियात्मक घटकांत पद धारण करणे, अथवा या घटनेत अन्यत्र प्रसंगविशेषी अंतर्भूत विविध नियमात स्पष्टपणे नमूद केलेल्या निबंधाच्या आधीन अशाच त-हेच्या बाहेरील संस्थांवर फेस्कॉमचे प्रतिनिधित्व करणे.
८.५ फेस्कॉमचे मुखपत्र ‘मनोहारी मनोयुवा’ यांत व अन्य प्रकाशनांत ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे व ज्येष्ठ नागरिक हितसंवर्धक चळवळीचे बाबत साहित्यिक, शैक्षणिक, संशोधनात्मक आणि मनोरंजनात्मक मूल्यांचे लेख लिहिणे.
OR
८.६ सभासदांनी स्वतःच्या अंतःप्रेरणेने संशोधनात्मक प्रकल्प हाती घेणे, आणि फेस्कॉमकडे शक्य त्या मदतीची विनंती करणे.
९. फेस्कॉमच्या (महासंघाच्या) सभासदांच्या जबाबदाऱ्या :
९.१ फेस्कॉमच्या कोणत्याही वर्गाच्या सभासदाला असलेले हक्क व विशेष हक्क, नियम ६.५ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे प्रतिनिधी उपभोगू शकेल.
९.२ प्रत्येक सभासद संधाने, दरवर्षी दिनांक १ एप्रिलनंतर सुरु होणाऱ्या वर्षाचे सभासदत्व शुल्क दिनांक १ एप्रिल ते ३१ मे या काळात भरणे बंधनकारक असून, सभासदत्व शुल्क त्या वर्षाचे ३१ मे चे आत न भरल्यास १ जुन पासून सदस्यत्व निलंबीत होईल. १ जून नंतर त्यावर्षाचे ३१ मार्चचे आत त्या सभासदास विलंब शुल्क रु. १००/- भरुन सभासद शुल्क भरता येईल. त्यामुळे एखाद्या सभासद संघाने फेस्कॉमशी संलग्रता स्वीकारल्यावर, केवळ वेळेवर शुल्क भरली गेली नाही. ह्या एका कारणासाठी त्या सभासद संघाची संलग्नता संपुष्टात येणार नाही. शुल्काची रक्कम प्राप्त होण्याच्या प्रत्यक्ष तारखेस फेस्कॉमकडून, अथवा फेस्कॉम प्रादेशिक विभागाकडून दिली गेलेली अधिकृत पावती, कोणत्या दिवशी शुल्काची रक्कम मिळाली, याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.
९.३ सभासदांची यादी फेस्कॉमचे सरचिटणीस सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६० च्या कलम १५ अन्वये फेस्कॉमच्या नोंदवहीमध्ये (मेंबर्स रजिस्टर) सोसायटीज रजिस्ट्रेशन रुल्स १९७१ च्या परिशिष्ट ६ मध्ये विहित नमुन्यात सभासदांची यादी ठेवतील.
भाग ३ – सभासदत्व रद्द होणे, शिस्तभंग कारवाई
१०) सभासदत्व रद्द होणे :
१० अ
कोणत्याही सभासदास स्वेच्छेने राजीनामा देऊन आपले सभासदत्व रद्द करता येईल.
१० आ नियम १०.२ व १०.३ मधील कार्यपद्धतीनुसार फेस्कॉमच्या कोणत्याही सभासदास त्याच्या गैरवर्तनाबद्दलच्या चौकशीसाठी पदावरून दूर केले जाऊं शकते, व व्यक्तिगत सभासदाचे बाबतीत त्याचे सभासदत्व तात्पुरत्या काळासाठी तहकुब ठेवले जाऊ शकते. चौकशीनंतर आवश्यकतेनुसार तहकुबी रद्द केली जाऊ शकते.
१० इ चौकशीच्या निर्णयात सभासदत्व कायम ठेवले गेले, तर तहकुबीच्या तारखेपासून / पदावरून दूर करण्याच्या दिनांकापासून चौकशीसाठीच्या एक वर्षापर्यंत वार्षिक शुल्क आणि / अथवा थकबाकी अदा न केल्यास.
१० ई “संलग्न संघाला संलग्ग्रता सोडावयाची असेल तर संबंधित संघाने त्या संबंधित प्रादेशिक कार्यकारिणीला किमान एक महिना अगोदर पूर्वसूचना (नोटीस) देऊन, त्यांच्या कार्यकारिणीत ठराव मंजूर झाल्यास त्या ठरावाच्या प्रतीसह संघ फेस्कॉमशी असलेली संलग्नता सोडत असल्याचे कळविणे आवश्यक आहे. मात्र सूचना नोटीस देणेपूर्वी त्या संघाने आपले फेस्कॉमशी असलेले सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करून रुजुवात करुन घेणे आवश्यक आहे. अशी कोणतीही रक्कम वा थकबाकी अशा संघाकडून फेस्कॉमला येणे असू नये. संबंधित संघसभासदाच्या संलग्नता सोडण्याच्या ठरावाच्या प्रतीसह, संबंधित प्रादेशिक विभागीय अध्यक्षांनी जारी केलेल्या थकबाकी नसल्याच्या प्रमाण पत्राची प्रत असणे आवश्यक आहे. जर वरील प्रक्रिया पूर्ण न करता व फेस्कॉमची देणे रक्कम न देता एखाद्या संघाने संलग्नत्व परस्पर सोडले तर संबंधित येणे रक्कमेच्या वसुलीसाठी आवश्यक तर नियामक मंडळ संबंधित संघ व त्या संघाचे पदाधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करु शकेल.
१०.२ गैरवर्तणुकीबद्दल सभासदत्व रद्द होणे: फेस्कॉमचे हितसंबंध किंवा ध्येये आणि उद्दिष्टे यांना बाधा येईल अशी कोणतीही कृत्ये वा कर्तव्यच्युतिमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही सभासदाचे फेस्कॉमचे सभासदत्व रद्द करण्याचे प्रस्तावाबाबत नियामक मंडळाने, संबंधित प्रकार विचारांत घेतांना त्या सभासदाकडून, अ) संघाच्या व / वा फेस्कॉमच्या अर्थव्यवहारात रकमांचा अपहार, आ) व / वा फेस्कॉमच्या जनमानसांतील प्रतिमेला तडा जाईल असे कोणतेही दिवाणी व / वा फौजदारी कृत्य इ.) व / वा सोसायटीज् रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६०, व / वा बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५०, च्या कोणत्याही कलमाचा भंग करणारी कृत्ये, ई) व/वा संबंधित व्यक्तीने दिवाळखोरी जाहीर करणे, ३) तसेच केंद्र सरकारने व/वा राज्यसरकारने जारी केलेल्या कोणत्याही कायद्याचा भंग केल्यामुळे न्यायालयीन शिक्षा सुनावलेली असणे, यापैकी कोणतीही कृत्ये झाली नसतील, तर असा कोणताही प्रस्ताव विचारांत घेतांना नियामक मंडळ एकही अपवाद न करता नैसर्गिक न्यायाची तत्वे पाळली जातील यासंबंधी आवश्यक ती सर्वपावले उचलून, ऊ) जर फेस्कॉमचे सभासदत्त्व कायमस्वरुपी रद्द करण्याइतके गंभीर कृत्य झाले नाही अशा निष्कर्षाप्रत केंद्रीय नियामक मंडळ येऊ शकेल अशी स्थिती असेल, तसेच असे वर्तन हे जाणुनबुजून केलेले वा दुर्भावनेतून केलेले नाही असे समजण्याची स्थिती असेल, तर संबंधित वर्तन हे गुन्हा न समजता चूक समजली जाईल, व केंद्रीय नियामक मंडळ अशा चुकीचे वर्तन करणाऱ्या सभासदाला समज देऊन भविष्यकाळात वर्तन सुधारण्याची संधी देईल. (ए) याशिवाय अशा सभासदाला फेस्कॉम व/वा त्याच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कोणत्याही पदासाठीच्या निवडणुकीला तीन वर्षासाठी अपात्र ठरवील. तसेच (ऐ) ह्या बाबीसाठी केंद्रीय नियामक मंडळाला असा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण मंडळासमोर (वार्षिक वा विशेष सर्वसाधारण सभा) ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही.
ओ) मात्र वि. स. स. किंवा वा. स. स. मध्ये माहितीसाठी ह्या निर्णयाचा तपशील स्पष्ट कराया लागेल.
(औं) एकदा समज देऊनही जर संबंधित सभासद वारंवार त्याच किंवा अन्य चुका करीत असेल तर तो गुन्हा समजला जाईल व त्या सभासदाचे सभासदत्व कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण मंडळासमोर ठेवणे केंद्रीय नियामक मंडळावर बंधनकारक असेल. वा.स.स. किंवा वि. स. स. अशा प्रस्तावाच्या न्यायोचिततेविषयी पूर्ण समाधान झाल्यावर, कार्यकारिणीच्या मतदानाच्या कार्यपद्धतीद्वारे तो प्रस्ताव मान्य करील. अशा गैरप्रकारांबाबतची तक्रार कोणताही सभासद केंद्रीय नियामक मंडळाकडे सबळ पुराव्याह करु शकेल. सहयोगी सभासद जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद नसेल तर तो स्वतंत्रपणे नियामक मंडळाकडे तक्रार दाखल करु शकेल. मात्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या कोणत्याही सभासदाने, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद असलेल्या सहयोगी सभासदाने संबंधित प्रकरणातील आपली तक्रार आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत प्रादेशिक विभागीय कार्यकारिणीकडे पाठविणे आवश्यक असून, अशी तक्रार आल्यास ही तक्रार त्वरित प्रादेशिक विभागीय कार्यकारिणीकडे पाठविणे संबंधित ज्येष्ठ नागरिक संघावर बंधनकारक आहे. तसेच अशी तक्रार ज्येष्ठ नागरिक संघाकडून मिळताच ती नियामक मंडळाकडे त्वरित पाठविणे प्रादेशिक विभागीय कार्यकारिणीवर बंधनकारक आहे.
१०.३ फेस्कॉमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याविरुद्द चौकशी: (अ) फेस्कॉमच्या घटनेविरोधात स्वतः वर्तन
करणे, व/वा तसे वर्तन करण्यांस अन्य कुणाला प्रवृत्त करणे, व/वा स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करुन अन्य कोणास घटनाविरोधी कृत्य करण्यास लेखी वा तोंडी सूचना देऊन भाग पाडणे, (आ) तसेच स्वतःच्या वर्तनाने प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे नियामक मंडळाच्या व/वा कोणत्याही पातळीवरील कार्यकारिणीच्या अधिकारांवर अतिक्रमण करणे, (इ) तसेच गैरवर्तणुकीबद्दल सभासदत्व रद्द होण्यासाठीचे कारणांपैकी कोणतेही कारण निर्माण करणे वा तसे कृत्य करणे, या बाबी गंभीर चूक व म्हणून गुन्हा समजण्याइतका महत्त्वाच्या असल्याने, संबंधित पदाधिकाऱ्याबाबत केवळ त्याला पदावरून दूर करणे, फेस्कॉमच्या कोणत्याही पदासाठी तीन वर्षासाठी अपात्र ठरविणे, किंवा फेस्कॉमचे त्याचे सभासदत्व कायमस्वरुपी रद्द करणे, तसेच फेस्कॉमच्या नुकसानी प्रकरणांत त्याचेवर आवश्यकतेनुसार दिवाणी व/वा फौजदारी दावा दाखल करून नंतर सभासदत्व रद्द करणे, यापैकी कोणत्याही प्रकारची शिक्षा प्रस्तावित करतांना, केंद्रीय नियामक मंडळ या प्रकरणात नैसर्गिक न्यायाची तत्त्चे योग्य प्रकारे लक्षांत ठेवून दूरदर्शी व सारासार विवेकी चौकशी करेल, व संबंधित पदाधिकाऱ्याचे भूतकाळातील फेस्कॉमसाठी योगदान, व त्याच्या चौकशीखालील वर्तनामुळे फेस्कॉमच्या सामाजिक प्रतिमेला तडा जाण्याचे प्रमाण, संबंधित पदाधिकाऱ्याचे वय व सामाजिक दर्जा यांचा परामर्ष घेऊन, एकही अपवाद न करतां, नैसर्गिक न्यायाची तत्वे पाळली जातील असे पाहून आपला तथ्यशोधक अहवाल वा. स. स. / वि.स.स. यांजसमोर विचारार्थ ठेवेल, व नियामक मंडळाच्या अहवालानुसार वा. स. स. / वि. स. स. साधकबाधक चर्चा करून नियामक मंडळाच्या शिफारसींवर निर्णय करील.
१०.४ कलम १०.२ व १०.३ साठींची चौकशीबाबतची कार्यपद्धती :
तक्रार दाखल झाल्यावर अध्यक्ष फेस्कॉम यांनी कमाल १५ दिवसांत तक्रारीचे प्रकरणी तपास करणेसाठी कोणा पदाधिकाऱ्यास पाठवावे. सदर पदाधिकाऱ्याने कमाल एका आठवड्यात तपासाचा अहवाल मा. अध्यक्ष यांना सादर करावा. अहवाल प्राप्त होताच कमाल एका आठवड्यात संबंधित सभासद /पदाधिकारी यांजकडून स्पष्टीकरण मागवावे. संबंधितांस उत्तर सादर करणेसाठी कमाल एक आठवडा मुंदत असेल. उत्तर समाधानकारक न वाटल्यास मा. अध्यक्ष, तीनही उपाध्यक्ष, सरचिटणीस, व कोषाध्यक्ष या सहा जणांसमोर कमाल पंधरा दिवसांत सुनावणी व्हावी व सुनावणीनंतर कमाल पंधरा दिवसांत तक्रारीचा निर्णय होईल. जर संबंधित सभासद / पदाधिकारी उत्तर देणे टाळत आहे, व / वा सुनावणी टाळत आहे असे जाणवल्यास एकतर्फी निर्णय जारी करण्याचा अधिकार सुनावणी घेणाऱ्या सहा जणांच्या अहवालानुसार केंद्रीय नियामक मंडळाला असेल, कांही तांत्रिक अडचणीमुळे अशी सुनावणी वरील सहांपैकी कोणाही पांच जणांसमोर होऊ शकेल. ही प्रक्रिया तक्रार झाल्या दिनांकापासून कमाल तीन महिन्यांत पूर्ण होईल. वरील दोन्ही कलमांचेबाबत नमूद केलेल्या चुका / गुन्हे याबाबतचा मजकूर मार्गदर्शक स्वरुपाचा असून, तो अशा चुका / गुन्हे यांची यादी नाही.
१०.५ पदाधिकाऱ्यांचे निलंबन व बडतर्फी :
कोणताही पदाधिकारी हा संस्थेचा नोकर नसल्यामुळे निलंबन व/वा बडतर्फी हा प्रश्न विचारांत येऊ शकत नाही. मात्र एकाद्या दखलपात्र व्यवहारामध्ये एखादा पदाधिकारी संशयित असेल, व अशा व्यवहारांत फेस्कॉमला कांही आर्थिक वा अन्य मिळकती स्वरुपात नुकसान सहन करावे लागत असेल, तर अशा पदाधिकाऱ्यांला कलम १०.२ व/वा १०.३ खालील चौकशी पूर्ण होईपर्यतच्या कारणासाठी पदावरुन दूर करण्याचा आदेश अध्यक्ष फेस्कॉम हे नियामक मंडळाच्या शिफारशीनुसार या सभासदावर लेखी बजावतील, व त्या काळापुरता तो सभासद त्या पदापासून दूर आहे असे समजले जाईल, व त्याला संबंधित दप्तर तपासणी / पाहणी अध्यक्षांच्या लेखी पूर्व परवानगीनेच करता येईल. अशी चौकशी शक्यतो कमाल तीन महिन्यांत पूर्ण व्हावी.
१०.६ या निमन्यायालयीन अधिकारांचा उपयोग नियामक मंडळ व सर्वसाधारण मंडळ अशा प्रकारच्या बाबतीत क्वचितच योग्य सावधानिनेच करेल, मात्र कोणत्याही स्वरुपाचा फौजदारी गुन्हा ह्या नियमाला अपवाद असेल, व फौजदारी गुन्हा दाखल करावाच लागेल.
भाग ४ – अन्य तरतुदी
११. फेस्कॉमचे विशिष्ट क्रियात्मक घटक :
सर्वसाधारण मंडळ (जनरल बॉडी) :
११.१ सर्वसाधारण मंडळाची रचना नियम ५.३ मध्ये तपशीलवार दर्शविल्याप्रमाणे सर्वसाधारण मंडळ हे सर्व वर्गाचे सभासद मिळून बनलेले आहे.
११.२ सर्वसाधारण मंडळाची वैशिष्ट्ये: हे फेस्कॉमचे सार्वभौम मंडळ असून फेस्कॉमचे अन्य सर्व कार्यकारी मंडळे व समित्या या मांडणीमध्ये फेस्कॉमच्या अधीनस्थ आहेत. घटनेत संदर्भात त्याला जास्तीत जास्त अधिकार आहेत. ते घटनेत दुरुस्ती वा घटनेचे पुनर्निरिक्षण करु शकते. फेस्कॉमच्या सुलभ प्रगतिसाठी ते स्वतः निर्माण केलेल्या विविध यंत्रणांच्या माध्यमांद्वारे नियम बनविण्याचे, अंमलबजावणीचे व निम-न्यायालयीन अधिकार वापरु शकते.
११.३ सर्वसाधारण मंडळाची सर्वसाधारण कार्यपद्धती त्याचे (मंडळाचे) मुख्य कार्य म्हणजे प्रतिवर्षी
सर्वसाधारण कामकाजासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा (यापुढे वा. स. स. असे शब्द वापरले आहेत) आणि विशेष सर्वसाधारण सभा (यापुढे वि. स. स. असे संबोधले आहे) एखाद्या विशिष्ट अथवा एकापेक्षा अधिक विशिष्ट कामासाठी बोलावणे हे होय. या सर्व सभांच्या अध्यक्षस्थानी फेस्कॉमचे अध्यक्ष राहतील, किंवा त्यांच्या अनुपस्थितीत निर्वाचित उपाध्यक्ष, किंवा दोहोंच्या अनुपस्थितीत नियुक्त उपाध्यक्षांपैकी कोणाची, वा तेही अनुपस्थित असल्यास सभेत उपस्थित असलेल्या प्रतिनिधीमधून एकाची निवड अध्यक्षपदासाठी करील. दोन्ही बाजूंनी समान मते पडल्यास सभाध्यक्ष आपल्या जादा मताचा उपयोग करतील.
११.४
वार्षिक सर्वसाधारण सभा (वा. स. स.): प्रत्येक वर्षी ३० सप्टेंबर रोजी अथवा त्या आधी वा. स. स.
आयोजित केली जाईल. सर्व बाबतीत व्यवस्था करण्याची जबाबदारी नियामक मंडळाची राहील. नियामक मंडळाने मान्यता दिलेला वार्षिक अहवाल, लेखा परिक्षण झालेली वार्षिक हिशेबपत्रके, व आगामी वर्षाचे अंदाजपत्रक यांचेसह वार्षिक सर्वसाधारण सभेची लेखी सूचना सरचिटणीस सूचना पाठविण्याच्या दिवशी सभासद नोंदवहीमध्ये असलेल्या सर्व सभासदांना वा. स. स. च्या तारखेच्या आधी पूर्ण २१ दिवसापेक्षा कमी नाही, अशा दिवशी साध्या टपालाने पाठवेल. (पूर्ण दिवस म्हणजे पाठविण्याचा दिवस व वा. स. स. चा दिवस वगळून) एखाद्या सभासदाला आकस्मिकपणे सूचना देणे राहूल गेल्यास, किंवा योग्य प्रकारे टपालाने पाठवूनही एखाद्या सभासदास ती न मिळाल्यास त्यामुळे ती सभा अथवा त्या सभेत झालेले कोणतेही कामकाज गैरकायदेशीर होणार नाही.
११.५ वार्षिक सर्वसाधारण सभेत काम चालविणे: वा.स.स. मध्ये खालील कामकाज केले जाईल.
१) आधीच्या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व आधीच्या सर्वसाधारण सभेच्या नंतर झालेल्या सर्व वि. स. स. च्या कार्यवृत्तांना मान्यता देणे.
२) आधीच्या वर्षाचा वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण झालेले हिशेबाचे तक्ते त्याचा हिशेब तपासणी अहवाल, किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडून आलेल्या तत्सम पत्रासह स्वीकारणे व मान्य करणे.
३) आगामी वर्षाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे.
४) आगामी वर्षासाठी अधिकृत हिशेब तपासनीसाची (ऑडीटरची) नियुक्ति करणे, व त्याचा मेहनताना निश्चित करणे.
५) सभाध्यक्षांच्या उचित परवानगीने सभासदांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करणे.
११.६ वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गणपूर्ती (कोरम) :
वा. स. स. आयोजित केल्याची सूचना पाठविण्याच्या दिवशी सभासद नोंदवहीमध्ये सभासदसंख्येच्या २० प्रतिशत एवढी वा.स.स. ची गणपूर्ती राहील. सभा सुरु करावयाच्या ठरलेल्या वेळेवर जर गणपूर्ती नसेल तर सभाध्यक्ष ती अर्ध्या तासासाठी स्थगित करतील, आणि ती पुनः त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर वा.स.स. चे कामकाज चालविण्यासाठी घेतली जाईल, त्या सभेला गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
११.७ वार्षिक व/वा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मतदानाची कार्यपद्धती :
फेस्कॉमचे सर्व प्रकारचे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये स्वतः, अथवा आपल्या अधिकृत प्रतिनिधिद्वारा हजर राहू शकतील. प्रत्येक सभासदाला आपल्यातर्फे फक्त एकच प्रतिनिधी नियुक्त करण्याचा हक्क राहील. मतदानाचे प्रसंगी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्याच्या दिवशी फेस्कॉमची वार्षिक वर्गणी नियमित भरणारा व फेस्कॉमच्या सर्व विविध प्रकारच्या कार्यामध्ये सहभाग घेणारा अशा क्रियाशील सभासद असणाऱ्या संघ सभासदांनी नियुक्त केलेल्या अधिकृत प्रतिनिधींनाच फक्त एक मत देण्याचा अधिकार आहे.
अ) सर्वसाधारण मंडळाच्या सभेत झालेला निर्णय असा निर्णय होण्याच्या दिवसापासून सहा पूर्ण महिने संपल्याशिवाय बदलता येणार नाही.
११.८ सर्वसाधारण सभेच्या विशिष्ट जबाबदाऱ्या खालील तीन प्रकरणी आपल्या विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडतांना वा. स. स. ला फार काळजीपूर्वक वागावे लागेल. या बाबी कलम १०.२, १०.३ व ११.३ मध्ये नमूद केल्या आहेत.
११.९ विशेष सर्वसाधारण सभा:
१) फेस्कॉमच्या सामान्य मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा खालीलप्रमाणे बोलाविली जाऊ शकेल.
अ) फेस्कॉमच्या अध्यक्षाद्वारा,
आ) नियामक मंडळातील बहुमताद्वारा मागणी केली गेल्यास,
इ) नोंदणी / पंजीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, तसेच
ई) अशा मागणीच्या अर्जाच्या दिनांकाला सभासद रजिस्टर (नोंद वहीमधील) सभासदांच्या २० प्रतिशत पैकी कभी नाही एवढ्या सभासदांनी लेखी मागणी केली असल्यास.
२) वरील प्रत्येक प्रकरणी मागणी मिळाल्या दिनांकापासून ३० दिवसाचे आंत सरचिटणीस विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करतील.
३) वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविण्यासंबंधी या आधी दिलेल्या नियमांतील कार्यपद्धती खालील दोन बाबी वगळता, विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीत लागू राहतील.
अ) वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षात फक्त एकदाच बोलाविण्यात येते, परंतु एका वर्षात विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची संख्या शून्य, एक वा एकापेक्षा अधिक असू शकते.
आ) वि. स. स. फक्त एक वा अधिक विशिष्ट हेतुसंबंधीचे कामकाज चालविण्यासाठी बोलाविली जाईल व ते विषय संबंधित वि. स. स. बोलाविणे बाबतच्या सूचनेत (नोटीस) स्पष्टपणे नमूद केले जातील, व त्यासोबत त्या विषयाबाबबत स्पष्टीकरण देणारी नोंद असेल.
१२.१ सभासदांची यादी फेस्कॉमचे सरचिटणीस सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६० च्या कलम १५ अन्वये, फेस्कॉमच्या रजिस्टरमध्ये सोसायटीज रजिस्ट्रेशन रुल्स १९७१ च्या परिशिष्ट ६ मध्ये विहित नमुन्यामध्ये सभासदांची यादी ठेवतील.
१२.२ वा.स.स. व बि. स. स. चे कार्यवृत्तांत :
वा. स. स. व/वा झाल्यानंतर ३० दिवसांचे आंत सरचिटणीस त्याच्या कार्यवृत्तांताचा कच्चा मसुदा फेस्कॉमच्या अध्यक्षांना पाठवतील. तो मिळाल्याच्या ३० दिवसांच्या आंत अध्यक्षांनी आपला अभिप्राय पाठवावयाचा असून त्यानंतर सरचिटणीस त्या कच्च्या मसुद्यांतील राहून गेलेल्या त्रुटी दूर करून पुढील वा. स. स. मध्ये मान्यतेसाठी (इतिवृत्त कायम करण्यासाठी) सादर करतील.
१२.३ सन २००७ च्या, महाराष्ट्र आईवडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७, व नियम २०१०, याखालील तक्रारींच्या वाढत्या संख्येच्या हिशेबांनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी तक्रारींची दखल घेण्यासाठी किमान एक कायदेसल्लागार / निम्नकायदे सहाय्यक स्वयंसेवक, निःशुल्क नियुक्त करावा. हा शक्यतो ‘ज्येष्ठांना कायदासेवा पुरविण्याचे राज्यसरकारचे धोरण २०१६’ नुसार व्यावसायिक कायदेसल्लागार व/वा वकिली परीक्षा उत्तीर्ण नसलेला एखादा कायदेसल्ला स्वयंसेवक असावा. हे फेस्कॉमचे मोफत कायदा सल्ला केंद्र असेल.
१२.३.१ जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांचेबाबत अशा प्रकरणांचा पाठपुरावा सरकार दरबारी करण्यासाठी फेस्कॉमने आपल्या आयव्यय पत्रक व ताळेबंद यांत दरवर्षी कांही रकमांची तरतूद करावी.
१२.३.२ फेस्कॉमशी संलग्न असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघांचे जे नियमित सभासद आहेत, व जे संघ क्रियाशील /सक्रिय आहेत, अशाच सभासदांच्या अशा तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक तेंव्हा हा निधी वापरला जाईल.
१२.४ छापील कागदपत्रांबाबत ः
पावती पुस्तके, निवडणूक अर्ज, छापील खर्च पावत्या, विविध नोंद वह्या, कीर्द व खतावणी यांचे नमुने मध्यवर्ती नियामक मंडळाने प्रदेश कार्यकारिणीला द्यावेत, व त्या नमुन्याबरहुकूम प्रदेश कार्यकारिणींनी ते छापून घ्यावेत. त्या सर्वांना त्या प्रकारांनुसार सलग्न अनुक्रमांक असावेत व त्यांची नोंदवही (छापील माल व दप्तर नोंदवही) ज्येष्ठ नागरिक संघ व प्रदेश कार्यकारिणी यांनी ठेवावी. कार्यनिर्देशिकेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार याबाबतची कार्यवाही होईल.
१२.५ सूत्रांचे हस्तांतरण :
नियतकालिक निवडणुका झाल्यावर ताबडतोब नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली सूत्रे देणे आवश्यक आहे. यांत हातावरील रोख शिल्लक, बँक पासबुके, चेक बुके, हिशेबाच्या वह्या, बँकखात्यांच्या रुजुवातीची पत्रके, उत्पन्नखर्च पत्रके, ताळेबंद, बैठकीची सभेची इतिवृत्ते असलेल्या वह्या, पावती पुस्तके, छापील स्टेशनरी, संपूर्ण पत्रव्यवहार, त्याबाबतची कार्यवाही याबाबतचा तपशीलही जुन्या पदाधिकाऱ्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यांत हयगय झाल्यास सर्व ज्येष्ठ नागरिक संघांच्या व समन्वय समित्यांच्या निवडणूक निकालानंतर प्रादेशिक विभागीय कार्यकारिणी १५ दिवसांत सूत्रांच्या हस्तांतरणाबाबत नियामक मंडळाकडे पाठवावयाचा असून, मध्यवर्ती नियामक मंडळाने काय कार्यवाही करावी याबाबतचा निर्णय, स्थलकाल परिस्थितीनुरुप मध्यवर्ती नियामक मंडळाने घ्यावयाचा आहे.
१२.५.१
प्रादेशिक पातळीवरील सूत्रांचे हस्तांतरण पद्धतशीरपणे होत नाही असे आढळल्यास त्याबाबतची कार्यवाही मध्यवर्ती नियामक मंडळाने निवडणूक पार पडल्यावर पंधरा दिवसांत करावयाची आहे. त्यासाठी अहवालाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
१२.५.२ सूत्रे हस्तांतरणाच्या प्रकरणांत हेतुपुरस्सर टाळाटाळ करण्यांत येत आहे असे आढळ्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्षांच्या शिफारशीनुसार मध्यवर्ती नियामक मंडळाने प्रदेशाध्यक्षांना द्यावयाचे असून, त्याबाबत करावयाच्या दिवाणी व/वा फौजदारी कार्यवाहीचा अधिकार प्रदेशाध्यक्षांना द्यावयाचे आहेत. ठराविक गोष्टी ठराविक पदाधिकाऱ्यांनी ठराविक काळांत न केल्यास संबंधित पदाधिकारी नाकर्तेपणामुळे घटनेचे कलम १०.२ व १०.३ याखाली चौकशीस पात्र होतील.
१२.६ हिशेबांचे सादरीकरण :
सर्व प्रादेशिक विभागांनी दिनांक ०१ एप्रिल ते ३० जून, व ०१ जुलै ते ३० सप्टेंबर, ०१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर आणि ०१ जानेवारी ते ३१ मार्च अशा चारही तिमाहिंचा जमाखर्च व आयव्यय पत्रके तिमाही संपल्यापासून पंधरा दिवसांत म्हणजे शक्यतो १५ एप्रिल, १५ जुलै, १५ ऑक्टोबर, १५ जानेवारी या दिनांकांना मुख्यालयाकडे सादर करावीत. वर्षअखेरचे हिशेबांची तपासणी होऊन संपूर्ण वर्षाची जमाखर्च पत्रके, आयव्यय पत्रके व ताळेबंद यांचे सादरीकरण शक्यतो ३० एप्रिलअखेर करावे. प्रदेशाध्यक्ष व खजिनदारांनी त्यांची तिमाही विवरणपत्रके मध्यवर्ती नियामक मंडळाकडे सादर करावयाची आहेत. दिनांक ३१ मार्च रोजी संपणाऱ्या वर्षाचे प्रदेशाचे जमाखर्च व आयव्यय पत्रक व ताळेबंद हिशेब तपासणींनंतर शक्यतो दिनांक ३१ मे पर्यंत सादर करावीत. मध्यवर्ती नियामक मंडळाकडून फेस्कॉमचे पूर्ण हिशेब तयार होऊन हिशेब तपासून होऊन दिनांक ३० जून ते १५ जुलैपर्यंत तयार असावेत. अशा हिशेबाने हे वेळापत्रक आहे. प्रत्येक स्थानिक संघाचा ताळेबंद वेगळा असेल. मात्र प्रदेशांचे हिशेबांचे संकलन मध्यवर्ती नियामक मंडळाचे फेस्कॉमच्या हिशेबांत घ्यावयाचे असून त्यासाठी वर्गणी वा देणग्या तसेच अन्य उत्पन्नांच्या प्रमाणानुसार संघपातळी ते मध्यवर्ती नियामक मंडळाचे पातळी अखेर मिळावयाच्या हिश्श्यांनुसारच्या रकमांची रुजुवात होणे आवश्यक आहे. या नियमाची सांगड कलम १४.३ घ मुद्दा क्र. २,३,४,५ यांचेशी घालून वेळापत्रकानुसार कार्यवाही करावयाची आहे.
१२.७ आर्थिक नियोजन :
१२.७.१ दर सहामाही व वार्षिक आढाव्यानुसार मध्यवर्ती नियामक मंडळाने आर्थिक धोरण आखणे अपेक्षित आहे. सर्व स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघांनी आपआपली वर्गणी किती असेल हे जरी स्वतंत्रपणे ठरवावयाचे असले तरी, मध्यवर्ती नियामक मंडळ तसेच प्रदेश कार्यकारिणी यांची धोरणे विचारांत घेतां, त्यांचे सल्लामसलतीने स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघांनी व्यक्तीगत सभासदाची सभासद वर्गणी ठरवावयाची आहे. आर्थिक गरजांनुसार वर्गणी रकमा कमीजास्त करणे, नवीन उत्पन्न स्त्रोतांचे संशोधन करणे, खर्च कपातीचे निर्णय घेणे, भविष्यात विविधमार्गे जमा होणाऱ्या रकांचे प्रदेश व मध्यवर्ती पातळीवरील विभाजनांचे प्रमाण बदलणे, जुन्या गुंतवणुकींचा आढावा व नव्या गुंतवणुकींबाबतचे निर्णय तसेच नवीन निधी उभारणे अशा सर्व बाबीचे नियोजन यांत समाविष्ट आहे.
१२.८ खर्चाची भरपाई :
कोणत्याही सभासदाने कोणत्याही पातळीवर केलेल्या, कोणत्याही खर्चाची भरपाई मागण्यासाठी, खर्च झाल्या दिनांकापासून कमाल दोन महिन्यांच्या आंत हिशेब सादर केले पाहिजेत. ज्या खर्चाला अगोदर मंजुरी मिळाली आहे, त्याला हे कलम लागू राहणार नाही. मात्र कोणत्याही बाबतीतील कोणताही हिशेब दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहू नयेत, व दर तमाहीअखेर असा कोणताही खर्चाचा हिशेब सादर करण्याचा व/वा देणेचा राहू नयेत, जर वरील मुदतीत खर्च मागणी अर्ज, पूर्वमंजुरीशिवाय खर्च करण्याच्या कारणांच्या तपशीलाशिवाय सादर झाला नाही, तर संबंधित सभासद खर्च मागणी करण्यास पात्र राहणार नाही. हा नियम स्थानिक संघ पातळीवरील सभासदांपासून, मध्यवर्ती नियामक मंडळाचे सर्व सभासदांना सरसकट लागू राहील.
१२.९ फेस्कॉमच्या प्रत्येक वर्षाच्या हिशोबाचे परीक्षण वार्षिक सर्वसाधारण सभेत याच हेतुसाठी योग्य प्रकारे नियुक्त केलेल्या चार्टर्ड अकाऊन्टन्ट कडून करवून घेतले जाईल. मात्र फेस्कॉमच्या व मनोहारी मनोयुवा विभागाच्या आपसांतील आर्थिक रुजुवातींचे परीक्षण फेस्कॉमच्या अंतर्गत हिशोब तपासनीसाकडून होईल. आर्थिक वर्षाच्या सर्व तिमाहींसाठी हिशोबाचे अंतर्गत परीक्षण योग्य प्रकारे पूर्ण झालेले आहे आणि अधिकृत हिशेब परिक्षकाकडे ते हिशोब पाठविण्यापूर्वी त्या संबंधीची पूर्तता कागदोपत्री झालेली आहे, हे नियामक मंडळ पाहील.
