श्री काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, खामुंडी तर्फे शुक्रवार दि.30-1-26 रोजी वर्धापन दिनाचे औचित्य साधून 32 जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.त्या निमित्ताने वाढदिवस सत्कार मूर्तींना मान,कंबर,गुढगे पाठ शेकविण्यासाठीच गरम पाण्याचे पिशव्यांचे वाटप करण्यात आले.तसेच संघाचे अध्यक्ष श्री अशोक कुसाळकर साहेब(ईवा फाऊंडेशन), लायन्स क्लब ओतूरचे अध्यक्ष श्री संतोष बोडके साहेब,श्री बबनराव गगे साहेब यांचेकडून 170 जेष्ठ नागरिक सभासदांना आधाराची काठयांचे वाटप करण्यात आले.सर्व जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांसाठी ओम चैतन्य हॉस्पीटल, आळेफाटा यांचेकडून मोफत आरोग्य शिबीर व औषधे वाटप करण्यात आले.विशेष सत्कार श्री संतोष बोडके,गणेश डुंबरे,मिलिंद भोर, व कैलास बोडके यांचा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष बोडके लायन्स क्लब ऑफ ओतूर हे होते.प्रमुख पाहुणे मा.एकनाथ डोंगरे सर अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ समन्वय समिती जुन्नर ,मा.माळवे सर ,मा.प्रा.डोंगरे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर 300 नागरिकांनी भोजनाचा असवाद घेतला. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष अशोक कुसाळकर व सर्व कार्यकारी सदस्यांनी केले.

