नांदेड
दि. 5 नोव्हेंबर रोजी श्री बाबाराव दिघे पाटील वय१०१वर्षे सौ.रूक्मिणी दिघे पाटील वय ९५ वर्षे रा. कारेगांव .ही जोडी आंधळी आहे. त्यांचे संगोपन त्याच्या सुनबाई सौ. पंचफुला दिघे या मनापासून करतात म्हणून त्यांचाही सत्कार आमच्या संघटनेने केला.जे.ना.जोडीचा यांचा सत्कार सौ. जयश्री पवार , महानगरपालिका सदस्य व सौ. सुनिता केंद्रे शिक्षिका यांच्या हस्ते केला. प्रसंगी फेस्कॅाम टीम व इतर सहकारी उपस्थित होते.
दिनांक 5 नोव्हेंबर 2024 मंगळवारी श्रीमती कोंडाबाई जळबा पाटील वय वर्ष 102 राहणार रायवाडी यांचा सत्कार डॅा.स्वेता संजय घोलप , बारामतीयांच्या हस्ते केला. याप्रसंगी फेस्कॅाम महिला समिती प्रमुख , उपाध्यक्ष व इतर सहकीरी बंधू , भगिनी उपस्थित होते.

