आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व डी.जे. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “आधारवड” या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालया मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व म्हाडाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव दादा आढळराव पाटील होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ
(फेस्कॉम) चे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी,फेस्कॉम पुणे प्रादेशिक
विभागाचे अध्यक्ष हनुमंत कुंभार, सचिव एकनाथ वाळुंज, देवराम नाबगे,प्रकाश खोचीकर, जुन्नर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे,भीमाशंकर सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे,निलेश थोरात,राजश्रीताई गांजाळे, संजय शेठ थोरात, सचिन भाऊ भोर, नवनाथ हुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समन्वय समितीचे कोष्याध्यक्ष सखाराम भालेराव यांनी प्रास्ताविक केले. फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे उपाध्यक्ष ए.एफ. इनामदार यांनी समितीने तयार केलेल्या स्मरणिकेबद्दल व समन्वय समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली.अध्यक्ष दशरथ भालेराव यांनी आपले विचार मांडले व नामदार साहेबांकडे विरगुळा केंद्रांची मागणी केली.
अण्णासाहेब टेकाळे, नामदार दिलीप वळसे पाटील, खासदार आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये ज्येष्ठांच्या जीवन शैलीबद्दल विचार व्यक्त करून आनंददायी जीवन जगण्याचा सल्ला दिला. नामदार साहेबांनी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र बांधून देण्याचे आश्वासन दिले.तसेच मंचर येथे तालुक्यातील ज्येष्ठांसाठी भव्य असे”ज्येष्ठ नागरिक भवन” उभारणार असल्याचे सांगितले.
यावेळी संजय शेठ थोरात, हनुमंत कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करून, शुभेच्छा दिल्या.ज्यांनी स्मरणिकेसाठी जास्तीत जास्त देणगी दिली त्यांचा तसेच मंचर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा व तालुक्यातील ४७ ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष व सचिव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोराडे सर यांनी केले,सोपान हुले सर यांनी आभार मानले.पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
एकनाथ वाळुंज,
सचिव, फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभाग

