*पुणे प्रादेशिक विभागाची कार्यशाळा संपन्न*
फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाची, पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सभासदांसाठी, एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच पुणे येथील
“सावरकर अध्यासन केंद्र,विवेक व्यासपीठ, डेक्कन कॉर्नर” या
ठिकाणी शनिवार दिनांक २७/१२/२०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेसाठी खेड,आंबेगाव,जुन्नर,
व हवेली तालुक्यातील संघांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजनाने व
साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली.
पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव एकनाथ वाळुंज यांनी उपस्थित मान्यवरांचे व सभासदांचे शब्द
सुमनांनी स्वागत केले.अध्यक्ष
हनुमंत कुंभार गुरुजी व उपाध्यक्ष
ए एफ इनामदार सर यांनी प्रास्ताविक केले.
फेस्कॉमचे मा.अध्यक्ष अरुण रोडे यांनी “राज्याचे व केंद्राचे ज्येष्ठ नागरिक धोरण व लाभाच्या योजना”
फेस्कॉमचे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी यांनी “संघाचे आर्थिक व्यवहार व कार्यालयीन कामकाज”,
अँड.बी.टी.निसळ यांनी “ज्येष्ठांसाठीचे विविध कायदे” जहांगीर हॉस्पिटलचे डॉ. देविका दामले व डॉ. सुरेश पाटील
यांनी”ज्येष्ठांचे आरोग्य”व माधवबागचे डॉ. मिलिंद सरदार
यांनी”ज्येष्ठांचे आनंदी जीवन”या विषयांवर व्याख्याने दिली.
यावेळी कोष्याध्यक्ष देवराम नाबगे,संचालक प्रकाश खोचिकर, गणेश व्यवहारे, सुजाता कानेटकर,फेस्कॉमचे कोष्याध्यक्ष रत्नाकर मानकर,फेस्कॉम जनकल्याण समितीचे अध्यक्ष सखाराम भालेराव,आंबेगाव तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथ भालेराव, जुन्नर तालुका समन्वय समिती अध्यक्ष एकनाथ डोंगरे,खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर,एकनाथ गोकुळे,किसनराव गायकवाड,
,पांडुरंग मोढवे,प्रकाश मांजरे,वसुधा देशपांडे, विजय मेंगर व
ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित
होते.सूत्रसंचालन एकनाथ वाळुंज व
इनामदार सर यांनी केले.आभार प्रकाश खोचिकर यांनी मानले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

