
मुंबई/ प्रतिनिधी- सुरेश पोटे
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक (फेस्कॉम)मुंबई प्रादेशिक विभाग
आयोजित ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिन 15 जून, निमित्ताने प्रमुख वक्ते विधी तज्ञ ॲड. प्रमोद ढोकले फेस्कॉम सल्लागार व यशवंतराव चव्हाण सेंटरचे विधी व सेवा सेंटरचे सक्रिय सदस्य, यांच्या उपस्थितीत दिनांक 21जून 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता
श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघ, डिलायंरोड, लोअर परेल, मुंबई येथे संपन्न झाला. सचिव मुकुंद फडतरे यांनी प्रास्ताविक करत सूत्र संचलन केले .फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभाग अध्यक्ष श्री.सुरेश पोटे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंद दिनी जनजागृती होणे गरजेचे आहे हे कसे आवश्यक आहे हे सांगितल.
१५ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरांवर जेष्ठ नागारिक छळवाद जन जागृती दिवस म्हणून पाळला जातो. त्याचा एक उपक्रम
म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले. अस त्यांनी नमूद केले.
विधी सल्लागार तज्ञ श्री प्रमोद ढोकले यांनी आपल्या खुमासदार, खुसखुशीत शैलीत केलेल्या भाषणात या दिवसाचे महत्व सांगून छळाचे प्रकार, त्या संबंधी घेण्याची काळजी, ज्येष्ठ नागरिक संघाची भूमिका काय असावी हे सांगितल. या वेळी समाजामध्ये ज्येष्ठां मध्ये छळवाद दिन जनजागृती नसल्यामुळे वारंवार विविध घटना घडत आहेत. या करिता जेष्ठांनी जागृत राहुन कायदा समजुन घेऊन सावध राहायला हव, जेष्ठांचा होणारा छळ, मानसिक, शारिरीक व आर्थिक तसेच लैंगिक या बद्दल समाजात चर्चा होत नाही. तसेच माहिती दडपली जात आहे. कारण आजची समाज वस्तुस्थिती ऐकायला तयार नसतो. यास्तव जेष्ठांचे प्रश्न वाढले आहेत. फसवणूक पिळवणूक होते, म्हणून पोलीसात तक्रार करावयाची म्हंटले तर हा घरचा मामला आहे असे म्हणून याकडे समाज आणि पोलीस दुर्लक्ष करतात.
पण सन 2007 कायदा काय सांगतो याची आठवण करून देताना एक ना अनेक ज्येष्ठांची होणारी छळवणूक या विषयावर अडव्होकेट ढोकले यांनी उदाहरण देऊन सविस्तर माहिती दिली. आपल्या ‘प्रॉपर्टी मधील हिस्सा / वाद कसा मिटवावा किंवा ज्येष्ठाच्या इच्छेप्रमाणे दानपत्र इच्छापत्र कायदेशीर कसे करावे यावर मार्गदर्शन केले. सर्व जेष्ठ नागरिक संघटनानी जेष्ठांच्या कायदयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन कुटूंबात – समाजात जाऊन जनजागृती करावी. म्हणजे जेष्ठांचे छळ कमी होण्यास मदत होईल. असे आवाहन ॲडवोकेट प्रमोद ढोकले यांनी केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन व्याख्यानाचा आनंद घेतला.
नंतर झालेल्या प्रश्नोत्तरात ज्येष्ठाच्या विविध प्रश्नांना ढोकले यांनी समर्पक उत्तरे दिली.
ना. म. जोशी मार्गचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद चंदनशिवे यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पोलीस दल ज्येष्ठांच्या मदती साठी तत्पर असल्याची ग्वाही दिली.
दिलीप गाडेकर, सदस्य फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभाग कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमास स्वाती फडके, लता पोवार, फेस्कॉम प्रतिनिधी उपस्थित होते.
