पंढरपूर… दिनांक 3 .12 .2024 रोजी सकाळी 11 वाजता फेस्कॉम, पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ, समन्वय समितीच्या वतीने पुणे प्रादेशिक विभागातील पहिलीच एक दिवशीय कार्यशाळा “मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर, पंढरपूर”येथे संपन्न झाली. पहिल्या सत्रात प्रार्थना झाल्यानंतर महाराष्ट्र फेस्काॅमचे माजी अध्यक्ष मा. अरुण रोडे साहेब यांनी संघटनात्मक कामकाज, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेलं राज्य व केंद्राचे धोरण, त्यामध्ये ज्येष्ठांसाठी असलेली तरतूद, भविष्यात ज्येष्ठ नागरिकांनी काय करावे?गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ या घोषणेप्रमाणे संघाची स्थापना करून ज्येष्ठांना करण्याची कार्यवाही फेस्कॉमचे सानेगुरुजी कुंभार गुरुजींच्या नेतृत्वाखाली करण्यात यावी.असे अरूण रोडे साहेब पुणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले
.महाराष्ट्र फेस्कॉमचे अध्यक्ष मा. डॉ.अण्णासाहेब टेकाळे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून दोन वर्षात विविध प्रकारच्या मागण्या मान्य करून घेण्यात आल्या असल्याचे तसेच.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे आरोग्य, प्रवास, सुरक्षा, आर्थिक धोरण, याविषयी केलेल्या मागण्या तात्काळ मंजूर करून घेण्यात यश आल्याचे व .ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापना, विविध शासकीय कमिटीवर नियुक्त्या या विषयी मार्गदर्शन केले.फेस्कॉमने ज्येष्ठांसाठी केलेल्या कार्याची व पुढील कामकाजाची माहिती देवून फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष कुंभार गुरुजी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
मनोरंजनातून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व विशद करताना माधवबागचे मिलिंद सरदार यांनी कार्यशाळेमध्ये चैतन्य निर्माण केले. “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार,” आनंदी जीवन कसे जगावे? याविषयी फेस्कॉमच्या आरोग्य कमिटीने प्रमुख मिलिंद सरदार माधवबाग यांनी अतिशय मार्मिक दाखले देऊन सभेला खेळवत ठेवले. आई वडील व ज्येष्ठ नागरिक पालनपोषण कायदा २००७ याविषयी ऍड शहाजी गुळमे पंढरपूर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले
भोजनानंतर दुपारी झालेल्या दुसऱ्या सत्रामध्ये शासनाने दिलेल्या सवलतीचा फायदा ज्येष्ठ नागरिकांनी घेतला पाहिजे त्यासाठी स्वतःहून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कासाठी झगडत राहून जे आपणाला मिळाले आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आधार कार्डा पेक्षा तहसीलदारचे ओळखपत्र फार महत्त्वाचे आहे. भविष्यात वयाचा पुरावा म्हणून तेच योग्य ठरणार आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी तहसीलदाराचे ओळखपत्र काढून घ्यावे, असे बहुमूल्य मार्गदर्शन मनोहारी मनोयुवा कौन्सिलचे प्रमुख तथा फेस्कॉमचे उपाध्यक्ष अंजुमन खान सांगली यांनी केले.
सधन समाजाकडून देणगी घेऊन निर्धन, वंचित, गरीब, गरजू समाजाला वस्तूंचे वाटप करण्याचे काम “हेल्पेज इंडिया” अहोरात्र करते.जर कुणाला मदत पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन हेल्पेज इंडियाचे मॅनेजर राजीव कुलकर्णी यांनी केले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कोणतेही नियोजन काटेकोरपणे झाले पाहिजे असे नेहमी आग्रही भूमिका घेणारे फेस्कॉम महाराष्ट्राचे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष मा.हनुमंत कुंभार गुरुजी, यजमान पंढरपुरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, आणि चंदाताई तिवाडी यांनी परिश्रम घेतले. मा. अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब टेकाळे यांनी मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर, पंढरपूर यांना पंधरा हजार रुपयाची देणगी जाहीर केली.
दिनांक ११ व १२जानेवारी २०२५ रोजी फेस्कॉमचे लातूर येथे होणाऱ्या ३४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती देवून सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून अधिवेशनाचा लाभ घेण्याचे आवाहान फेस्कॉमचे संघटक सचिव डॉ.बी.आर.पाटील लातूर यांनी केले.
शेवटी चंदाताई तिवाडी यांनी मा. अरूण रोडे साहेब ,मा.डॉ. अण्णासाहेब टेकाळे, मा. अंजुमन खान, महाराष्ट्र फेस्कॉमचे मुख्य सचिव मा. चंद्रकांत महामुनी, मा. मिलिंद सरदार मा. राजीव कुलकर्णी, मा. हनुमंत कुंभार गुरुजी, विवेक कुंभार, पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव एकनाथ वाळूंज खेड, सहसचिव भास्करराव थोरात, सदस्य प्रकाश खोचीकर कराड , राजाभाऊ व्यवहारे, मातोश्री वृद्धाश्रमाचे सर्व पदाधिकारी व कार्यशाळेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचे व सोलापूर जिल्हा समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन व सूत्रसंचलन मा. हनुमंत कुंभार गुरुजींनी केले. कार्यशाळेमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
*अर्जुन गाडे*
*सचिव*
*सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक*
*संघ,समन्वय समिती*.


