शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे.

!! ज्येष्ठ नागरिकांना विनम्र आवाहन !!
शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा व लोकसभा पोट निवडणूक साठी होणाऱ्या मतदानात आपला सहभाग अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण मतदार संख्येच्या पंधरा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत, ही टक्केवारी निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, निर्णायक ठरणारी आहे.
आपण जेष्ठ नागरिक म्हणून आता ही जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे आपले मतदान करावे परंतु आपल्या बरोबर आपल्या कुटुंबातील सर्व मतदान करतील याची खात्री करावी, त्याचबरोबर आपल्या शेजारी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी किमान दहा घरांमध्ये जाऊन मतदान होईल असे बघावे.
एक ज्येष्ठ नागरिक जर त्यांचा शेजारच्या 10 घरांमधून मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करू शकले, तर संविधानाने दिलेल्या मतदार हक्काचा खऱ्या अर्थाने पालन केल्यासारखे होईल.
नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, यांनी नुकतेच ज्येष्ठ नागरिकांसमवेत मतदान जागृती संदर्भात घेतलेल्या बैठकीमध्ये सविस्तर मतदानाविषयी माहिती देऊन ज्येष्ठ नागरिकांना मतदानाच्या वेळेस प्रत्येक बुथवर सुविधा प्राप्त करून देण्याचे सुद्धा माहिती दिली.
सर्व मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी रांगेत उभे न राहता प्राधान्य क्रमाने मतदान करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजीतजी राऊत यांनीही मतदान जागृती अभियान कार्यक्रमात मतदान शपथ मतदारांकडून घेतली, तसेच सेल्फी पॉईंट चे उद्घाटन डॉक्टर अशोक तेरकर यांच्या हस्ते करून सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा विनम्र आवाहन करू इच्छितो आपण मतदान करावेच आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील सर्वांना मतदान करायला लावावे त्याचबरोबर आपल्या शेजारी घरांमधून मतदान करायला प्रवृत्त करावे.

डॉ. अशोक तेरकर

  • उपाध्यक्ष, FESCOM

डॉ. मेजर निर्मला कोरे

  • अध्यक्ष, महिला आघाडी FESCOM