मा. श्री. अण्णासाहेब टेकाळे

अध्यक्षीय मनोगत

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या म्हणजेच कस्कॉमच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन सर्वप्रथम मी येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि राज्यातील तमाम जनतेला हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि महत्वाचे म्हणजे आरोग्यदायी जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. फेस्कॉमचे हे अधिवेशन लातूरसारख्या महत्त्वाच्या शहरात भी तसा धाराशिव जिल्ह्याचा रहिवासी आहे. पर्वी लातूर हा आमच्याच भरत आहे.

धाराशिव जिल्ह्याचा भाग होता. त्यामुळे लातूर शहराविषयी मला विशेष प्रेम आहे. माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि माननीय विलासरावजी देशमुख असे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याने राज्याला दिले. कामाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांना अनेकदा भेटण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने हे दोन्ही नेते आज आपल्यात नाहीत. पण लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष तसेच माजी गृहमंत्री मी शिवराज पाटील चाकूरकरजी, देशातील नामवंत अशा एम. आय. टी. शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराडजी हेसुद्धा याच लातूरचे. लातूरभूषण व्यक्तिमत्त्वांची यादी करायला बसलो तर खूप ती मोठी बनेल. असे अनेक रथी-महारथी या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले. या ऐतिहासिक तातूर शहरात आपले अधिवेशन भरत आहे याचा खूप आनंद वाटतो. अधिवेशनास जमलेल्या वयाने ज्येष्ठ परंतु मनाने तरुण असलेल्या माझ्या सर्व प्रतिनिधींचे फेस्कॉमचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो.

फेस्कॉम हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोहोचले आहे. पण नुसते नाव पोहोचले म्हणजे संस्था मोठी होत नसते. त्यासाठी कार्यक्षम आणि कर्तव्य कठोर पदाधिकारी हितचिंतकांची संघटनेला नेहमीच गरज असते. आपली ही संस्था स्थापन होऊन ४५ वर्षे झाली. मी गेली १८ वर्षे या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे. वेगवेगळी पदे भूषवल्यानंतर आता माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. माझ्या अगोदर मा. डॉ. शं. पा. किंजवडेकर, मा. घोलप साहेब, मा. म. भा. कुलकर्णी, मा. कोडोलीकर, मा. दत्तात्रय चौधरी, मा. अरुण रोडे अशा अनेक मान्यवरांनी हे पद भूषवले आहे. त्यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने ही संस्था वाढवली आणि जोपासली आहे. या लोकांनी प्रचंड काम केले. हेच काम आपल्याला पुढे चालवायचे आहे. अध्यक्षपद ही एक तांत्रिक जबाबदारी आहे. कोणतीही संघटना एकट्या अध्यक्षाच्या बळावर मोठी होत नसते. त्याला हजारो हातांची मदत मिळते तेव्हा संघटना काहीतरी भरीव काम करू शकते.

वयाच्या साठीनंतर नोकरीतून आपण निवृत्त झालेलो असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या बहुतांशपणे पार पडलेल्या असतात. मुलेबाळे आपापल्या नोकरी किंवा व्यवसायात स्थिरावलेले असतात. त्यामुळे काम करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. साठीनंतरचे ज्येष्ठांचे आयुष्य समाधानाचे आनंदाचे जावो यासाठीच १९८० साली फेस्कॉम या संघटनेची स्थापना झाली. ही संघटना स्थापन होऊन ४४ वर्षे zaliअध्यक्षीय मनोगत

हाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या म्हणजेच कस्कॉमच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन सर्वप्रथम मी येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि राज्यातील तमाम जनतेला हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि महत्वाचे म्हणजे आरोग्यदायी जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. फेस्कॉमचे हे अधिवेशन लातूरसारख्या महत्त्वाच्या शहरात भी तसा धाराशिव जिल्ह्याचा रहिवासी आहे. पर्वी लातूर हा आमच्याच भरत आहे.

धाराशिव जिल्ह्याचा भाग होता. त्यामुळे लातूर शहराविषयी मला विशेष प्रेम आहे. माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि माननीय विलासरावजी देशमुख असे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याने राज्याला दिले. कामाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांना अनेकदा भेटण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने हे दोन्ही नेते आज आपल्यात नाहीत. पण लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष तसेच माजी गृहमंत्री मी शिवराज पाटील चाकूरकरजी, देशातील नामवंत अशा एम. आय. टी. शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराडजी हेसुद्धा याच लातूरचे. लातूरभूषण व्यक्तिमत्त्वांची यादी करायला बसलो तर खूप ती मोठी बनेल. असे अनेक रथी-महारथी या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले. या ऐतिहासिक तातूर शहरात आपले अधिवेशन भरत आहे याचा खूप आनंद वाटतो. अधिवेशनास जमलेल्या वयाने ज्येष्ठ परंतु मनाने तरुण असलेल्या माझ्या सर्व प्रतिनिधींचे फेस्कॉमचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो.

फेस्कॉम हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोहोचले आहे. पण नुसते नाव पोहोचले म्हणजे संस्था मोठी होत नसते. त्यासाठी कार्यक्षम आणि कर्तव्य कठोर पदाधिकारी हितचिंतकांची संघटनेला नेहमीच गरज असते. आपली ही संस्था स्थापन होऊन ४५ वर्षे झाली. मी गेली १८ वर्षे या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे. वेगवेगळी पदे भूषवल्यानंतर आता माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. माझ्या अगोदर मा. डॉ. शं. पा. किंजवडेकर, मा. घोलप साहेब, मा. म. भा. कुलकर्णी, मा. कोडोलीकर, मा. दत्तात्रय चौधरी, मा. अरुण रोडे अशा अनेक मान्यवरांनी हे पद भूषवले आहे. त्यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने ही संस्था वाढवली आणि जोपासली आहे. या लोकांनी प्रचंड काम केले. हेच काम आपल्याला पुढे चालवायचे आहे. अध्यक्षपद ही एक तांत्रिक जबाबदारी आहे. कोणतीही संघटना एकट्या अध्यक्षाच्या बळावर मोठी होत नसते. त्याला हजारो हातांची मदत मिळते तेव्हा संघटना काहीतरी भरीव काम करू शकते.

वयाच्या साठीनंतर नोकरीतून आपण निवृत्त झालेलो असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या बहुतांशपणे पार पडलेल्या असतात. मुलेबाळे आपापल्या नोकरी किंवा व्यवसायात स्थिरावलेले असतात. त्यामुळे काम करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. साठीनंतरचे ज्येष्ठांचे आयुष्य समाधानाचे आनंदाचे जावो यासाठीच १९८० साली फेस्कॉम या संघटनेची स्थापना झाली. ही संघटना स्थापन होऊन ४४ वर्षे झाली

आपली ही संघटना पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० तसेच सोसायटीज अॅक्ट १८६० अन्वये धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे संस्था किंवा संघटना चालवण्यासाठी नियम आवश्यक असतात पासाठीच फेस्कॉम या संघटनेचीडी स्वतंत्र नियमावली किंवा घटना आहे. संस्थेच्या संपूर्ण कामाची माहिती दरवीं ठराविक नमुन्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयात द्यावी लागते. फेस्कॉमचे मुख्यालय नेरूळ, नवी मुंबई येथे आहे

आपल्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. सर्वच जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक राहुत असल्याने संघटनेला काम करणे सोपे जावे म्हणून राज्यभरात संघटनेचे १४ प्रादेशिक विभाग कार्यरत आहेत. त्या त्या विभागातील जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना स्थापन करून त्या फेस्कॉमला संलग्न करण्याचे काम अव्याहत चालू असते. देशभरात १५ कोटी तर राज्यात दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, २५७ तालुके आणि ४०.२३३ गावे आहेत. या सर्व ठिकाणचे मिळून साधारण साडेपाच हजार ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. ढोबळ मानानुसार १६ ते १७ लाख सभासद हे संलग्न आहेत. ही संख्या तशी कमी आहे. या पुढील काळात क्रियाशील सदस्य बनवण्यावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ही संख्या किमान २५ लाखांपर्यंत जावी असा मानस आहे. त्या दृष्टीने मी आणि माझी कार्यकारणी तसेच प्रादेशिक विभागातील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. हे काम खूप अवघड आहे असे वाटत नाही. फक्त प्रत्येक सभासदाने दिवसातील किमान दोन तास संघटनेसाठी दिले तरी फेस्कॉमचा विस्तार झपाट्याने होऊ शकेल.

प्रत्येकाने आप आपल्या विभागातही आणखी चांगले काम झाले पाहिजे, अशी जिद्द आणि आत्मविश्वास सर्व प्रादेशिक विभागांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवला तर हे काम जलद गतीने होऊ शकेल. असा मला विस्वास आहे.

फेस्कॉमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण “फेसकॉम ज्येष्ठांच्या दारी” ही अभिनव मोहीम राबवली. वयाची शंभरी पूर्ण केलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांचा आपण त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र हे अभियान राबवले गेले. आधी वाटत होते. शंभरी पार केलेले दोन-चार लोक मिळतील परंतु जसजशी सर्व जिल्ह्यांतून माहिती गोळा होत गेले तेव्हा काही ठिकाणी पंधरा तर काही ठिकाणी शंभरी पार वीस महिला आणि पुरुष आढळले आढळले. फेस्कॉमच्या पदाधिकाऱ्यांनी घरी येऊन आपला सत्कार केल्याबद्दल त्यांनाही खूप आनंद झाला. यासारखे वेगळे आणि चांगले उपक्रम आपल्याला येणाऱ्या काळात राबवायचे आहेत त्यासाठी प्रादेशिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी सूचना कराव्यात.

राज्यात माननीय एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले.

१) ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास.

२) शाळकरी मुलींपासून ते वयाची ७५ पार केलेल्या सर्व महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत.

३) साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी.

४) प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन.

५) आरोग्य विभागाच्या सनियंत्रण समित्यांवर ज्येष्ठांना प्रतिनिधित्व.

६) महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणे, यासाठीची जी दीड लाखांची मर्यादा होती ती पाच लाखांपर्यंत वाढवणे.

७) ज्येष्ठ नागरीकांच्या योजनेची, धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी ज्येष्ठ नागरीक कल्याणकारी महामंडळाची स्थापना.८) महानगरपालिका स्तरावर देखील स्थानिक प्रवास सवलत ठाणे नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून सुरू केली

असे अनेक मांगले निर्णय माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सरकारने घेतले सरकारने असे निर्णय घ्यावेत यासाठी फेस्कॉमच्या सर्व पदाधिकान्यांनी हैल्लोवेव्ही पाठपुरावा केला हे सांगताना मता आनंद होत आहे

ज्यात नागरिकांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जलदगतीने मोहवण्यासाठी येणान्या काळात राज्यात स्वतंत्र मंत्रालय कार्यान्वित होण्याची शक्यता गरज आहे

अनेक प्रश्न आपल्याला शासन दरबारी पाठप्रावा करून सोडवायचे आहेत प्रामुख्याने उदेख करायचा झाला तर परवाच नांदेड/नागपुर येथे झालेल्या प्रादेशिक विभागाचे मेळाव्यात काही मागण्या पुढे आल्या आहेत. त्यांचाही आपण शासन

दरबारी पाठपुरावा करू,
१)ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात असलेली ५०% सवलत पुन्हा सुरू करणे.

२) आंध प्रदेश आणि तेलंगणा राज्यात ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपये पालन व पोषण भत्ता म्हणून दिला जातो असे समजते. हीच योजना महाराष्ट्र सरकारने सुरू करावी आणि त्यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला किमान ३००० रुपये मिळावेत यासाठी प्रयत्न करणे.

३) ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळावर आपल्या फेस्कॉम या संघटनेला ५०% प्रतिनिधित्व मिळावे असा आग्रह धरणे.

४) केंद्र सरकारचे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ६५ वर्षांची अट रद्द करून ती ६० करावी यासाठी प्रयत्न करणे. तसेच एस. टी. प्रवासास देखील ६० पासून सवलत देण्यात यावी.

५) ग्रामपंचायतपासून ते महापालिकेच्या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तीनऐवजी पाच टक्के तरतूद करावी.

६) शासनाने विरंगुळा केंद्राची उभारणी करुन, सोयीसुविधांसह ते स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघटनांना देण्यात यावेत.

७) ज्येष्ठ नागरिकांना तातडीची वैद्यकीय सेवा (गोल्डन अवर वेळ) उपलब्ध करून देण्यासाठी ‘हॉस्पिटल्स ऑन व्हील’ सेवा राज्यभर सुरू करावी.

८) लाडकी बहीणच्या धर्तीवर लाडके माय बाप योजना त्वरित सुरू करावी.

अशा काही प्रमुख मागण्या साठी सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

जेष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य आनंदी, सुखी व समाधानी जावे यासाठी प्रयत्न आपण सारे जण प्रयत्न करू, याबाबत वेळोवेळी चर्चा व विचारविनिमय होईलच. राज्यातील जेष्ठ नागरीक यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणा सर्वांचे उर्वरित आयुष्य सुखाचे समाधानाचे व आरोग्यदायी जावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

धन्यवाद !

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

आपलाच,

अण्णासाहेब टेकाळे
अध्यक्ष