फेस्कॉमचे मुखपत्र: मनोहारी मनोयुवा



मनोहारी मनोयुवा नियतकालिक हे फेस्कॉमचे मुखपत्र आहे, हा अंक प्रथम मे १९९३ मध्ये डोंबिवली येथे प्रकाशित करण्यात आला. नियामक मंडळाने वेळोवेळी ठरविलेल्या कालावधीप्रमाणे ते प्रकाशित केले जाते.

१५.२ ध्येये व उद्दिष्टे:

१) फेस्कॉमने अंगिकारलेल्या योजना व प्रकल्प यासंबंधीचे अहवाल प्रकाशित करणे.

२) ज्येष्ठ नागरिकांच्या कोणत्याही संघटनेने आयोजित केलेले विशिष्ट कार्यक्रम किंवा महत्वपूर्ण घटना आणि अशा संघटना व त्यांचे सभासदांच्या विशेष उपलब्धींना प्रसिद्धी देणे.

३) ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित आरोग्यविषयक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रश्नावरील प्रचलित आवडीचे लेख प्रकाशित करणे.

४) ज्येष्ठांचे लेख प्रकाशित करुन त्यांच्या साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिभेला उजाळा देणे.

५) मनोयुवा प्रकाशनात वर्गणीदारांच्या परिवारांचा सहभाग निर्माण व्हावा म्हणून त्यांच्या आवडीच्या बाबींचा समावेश करणे.

१५.३ दर्जा: फेस्कॉमच्या छत्राखाली मनोयुवा प्रकाशनाला प्रादेशिक विभागापेक्षा वेगळा दर्जा राहील. त्यासाठी फेस्कॉम नियामक मंडळाने दिनांक १२/११/२०१७ पासून वेगळा उपाध्यक्ष असावा, असा निर्णय घेतला आहे. त्याचे अध्यक्षतेखाली मनोयुवा प्रकाशन आपले निर्णय स्वतः घेऊ शकेल व आपले प्रशासन चालवू शकेल. मनोहारी मनोयुवा प्रकाशनाला स्वायत्त दर्जा राहणार नाही.

१५.४ मनोहारी मनोयुवा मंडळ (मनोयुवा कौन्सिल) रचना मनोयुवा मंडळाची रचना खालीलप्रमाणे राहील.

क) पदाधिकारी : १) मनोहारी मनोयुवा मंडळाचे प्रमुख हे फेस्कॉमचे नियुक्त उपाध्यक्ष त्यांच्या त्या कालावधीपुरते असतील. २) संपादक, ३) मनोयुवा सचिव, ४) मनोयुवा कोषाध्यक्ष

ख) सदस्य : १) फेस्कॉमचे अध्यक्ष व सरचिटणीस पदसिद्ध, २) दोन उपसंपादक, ३) एक प्रसार माध्यम अधिकारी, ४) प्रत्येक वर्षी मनोयुवा मंडळाने सुचविलेले विभागीय मंडळांनी आळीपाळीने नियुक्त केलेले दोन सभासद, ५) स्थानिक व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष.

१५.५ मनोयुवा मंडळाचा कालावधी: नियामक मंडळाचा विश्वास असेपर्यंत मनोयुवा मंडल चालू राहील.

१५.६ मनोयुवा मंडळाची निर्मिती :

१) नियामक मंडळ मनोयुवा मंडळाचा प्रमुख व संपादक या पदांवर योग्य व्यक्तिची नियुक्ति करेल.
२) आपापला पदभार क्रमशः सांभाळल्यानंतर मनोयुवा मंडळाचा प्रमुख हा संपादकाशी सल्ला मसलत करुनच मनोयुवा सचिव, मनोयुवा कोषाध्यक्ष व प्रसार माध्यम अधिकारी या पदांवर नियुक्ती करेल.

३) संपादक हा उपसंपादकांच्या दोन्ही पदांवर योग्य व्यक्तिंची नियुक्ती करेल. या पदांवर केलेली सुरुवातीची नियुक्ती व तदनंतर कालावधीत केव्हाही केलेल्या नियुक्तिची माहिती तो नियामक मंडळ व मनोयुवा मंडळ यांना देत राहील.

४) प्रादेशिक विभागीय मंडळे दोन सदस्यांची नियुक्ति करतील. मनोयुवा मंडळाच्या सुचनेनुसार दरवर्षी आळीपाळीने प्रत्येक विभागीय मंडळाचा एक याप्रमाणे.

१५.७ मनोहारी मनोयुवा मंडळाच्या सभा: आपल्या सभांच्या सुव्यवस्थित संचालनासंबंधी मनोयुवा मंडळ स्वतःसाठीचे नियम तयार करेल.

१५.८ मनोहारी मनोयुवा मंडळाचे अधिकार व कर्तव्ये : मनोहारी मनोयुवाशी संबंधित खालील सर्व बाबीसाठी मंडळ जबाबदार राहील.

क) फेस्कॉमचे उद्देश व धोरण व्यक्त करणे.

ख) ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या परिवारांना उपयुक्त लेख, कविता, बातम्या व अन्य वाड्मय गोळा करणे, व त्याची योग्यता पडताळणे.

ग) मनोहारी मनोयुवासाठी जाहिराती, देणग्या आणि वर्गणी गोळा करणे.

घ) मनोहारी मनोयुवाचा दर्जा, त्याचे वेळेवर प्रकाशन आणि योग्य वितरण, यावर लक्ष ठेवणे.

च) प्रकाशन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी व समाजात अधिकाधिक प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करणे.

छ) नियामक मंडळासमोर सादर करण्यासाठी मनोयुवाचा अहवाल व अंदाजपत्रक तयार करणे.

ज) मनोहारी मनोयुवा मंडळाच्या सभा साधारणतः वर्षात चार वेळा दर तीन महिन्यांनी एक अशा होतील.

१५.९ मनोहारी मनोयुवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये : नियुक्त उपाध्यक्ष फेस्कॉम हे मनोहारी मनोयुवाचे पदसिद्ध प्रमुख असतील,

१) ते मंडळाच्या सर्व सभांच्या अध्यक्षस्थानी राहतील.

२) मंडळाच्या कार्याला दिशा देणे व नियंत्रण ठेवणे व त्याच्या कार्यात समन्वय व सुसंवादितता आणणे.

संपादक : १) सर्व वाचनीय मजकुरावर अखत्यार असेल. लेख, कविता वगैरे तपासेल, आणि त्यांचे प्रकाशन करणे वा न करणे, याबाबत निर्णय घेईल. २) प्रमुखाच्या अनुपस्थितीत मंडळाच्या सभांचे अध्यक्षस्थान स्वीकारेल.

सहसंपादक : १) मंडळ वा संपादकांच्या निर्णयानुसार मनोयुवा विभागाचे / विभागांचे काम सांभाळणे.

प्रसारमाध्यम अधिकारी : जाहिराती मिळवितील व मनोहारी मनोयुवाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अन्य साधनांचा शोध घेईल.

मनोयुवा सचिव : १) मनोयुवा कार्यालय सांभाळेल. २) सर्व पत्रव्यवहार करेल.

मनोयुवा कोषाध्यक्ष : मनोयुवाचे सर्व हिशेब अद्ययावत ठेवेल व ते फेस्कॉमच्या नियामक मंडळासमोर व वार्षिक साधारण सभेत सादर करण्यासाठी आर्थिक वर्षाचे अखेरीस अधिकृत हिशेब परिक्षकाकडून परिक्षण करुन घेईल.

सदस्य:

१) मनोयुवासाठी जाहिराती, देणग्या व वर्गण्या गोळा करुन, मंडळाला सहाय्य करेल.

२) ज्येष्ठ नागरिक, सत्ताधारी, संशोधक इत्यादिकडून दर्जेदार लेख गोळा करून मंडळास पाठवेल.

३) मनोहारी मनोयुवात प्रकाशनासाठी महत्वपूर्ण बातम्या व संघ सभासदाकडून लेखांचा अहवाल पाठवेल.

स्थानिक व्यवस्थापन समिती:

१) मंडळाच्या सहाय्यार्थ व विशेषतः मनोयुवाचे मुद्रण व वितरण यात मदत करण्यासाठी ७ स्थानिक व्यक्तिंची (ज्या शहरांत मुद्रण व प्रकाशन होत असेल तेथील) स्थानिक व्यवस्थापन समिती निर्माण करण्यांत येईल.

२) संपादकांच्या मान्यतेने मनोयुवा मंडळाचा प्रमुख समितीच्या सदस्यांची निवड करेल.

३) समिती आपल्या प्रमुखाची निवड करेल, जो मनोयुवा मंडळाचा स्वीकृत सदस्य राहील.

४) मनोयुवासाठी जाहिराती, देणग्या, वर्गण्या गोळा करण्याचे कामी आणि मनोयुवाचे नियमित प्रकाशन व वितरण व्हावे यात मदतीसाठी समितीची दर २ महिन्यांनी एकदा अथवा आवश्यकतेनुसार अधिक वेळा बैठका होतील.

१५.१० वर नमूद केलेले अधिकार व कर्तव्ये या व्यतिरिक्त मनोयुवा मंडळ आपल्या विवेक बुद्धीनुसार अतिरिक्त कामे सोपवू शकेल.