खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ राजगुरूनगर, ता.खेड जि. पुणे यांचे माध्यमातून मौजे चाकण व रासे ता. खेड जि. पुणे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची एकत्रित मिटिंग चाकण या ठिकाणी शनिवार दि.२२/०३/२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर मिटींगला चाकण व रासे गावातील सुमारे २५ ते ३० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.या दोन्ही ठिकाणी नवीन संघ स्थापनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना खेड तालुका ज्ये. ना. संघाचे अध्यक्ष मधुकरराव खेडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गवते व सचिव एकनाथ वाळुंज यांनी सविस्तर उत्तरे दिली.उपस्थितांना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) या संघाच्या कार्याबाबतची माहिती फेस्कॉम, पुणे प्रादेशिक विभागाचे (पुणे, सातारा, सोलापूर) विभागीय सचिव एकनाथ वाळुंज यांनी दिली.
नवीन संघ स्थापनेबाबत साधक बाधक चर्चा होऊन चाकण येथे एक व रासे येथे एक असे दोन नवीन संघ स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले.त्यानुसार संग्रामदुर्ग ज्येष्ठ नागरिक संघ चाकण
व शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ रासे या दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली.लवकरच हे दोन्हीही संघ फेस्कॉम, पुणे प्रादेशिक विभागाशी संलग्न होणार आहेत.
यावेळी जय मल्हार ज्ये. ना. संघ मेदनकरवाडी संघाचे अध्यक्ष गणपतराव मेदनकर,उपाध्यक्ष प्रकाशशेठ मांजरे, सचिव दिलीप येवलकर, संग्रामदुर्ग ज्ये. ना. संघाचे अध्यक्ष नारायणराव घोडेकर,शिवशक्ती ज्ये. ना.संघाचे अध्यक्ष हनुमंत केदारी,हनुमंत शिंदे, सुभाष शिंदे,ज्ञानोबा मुंगसे, कदम सर,रामदास शिंदे, मुरलीधर मंडलिक,पाबळे सर, कुंडलिक गोरे,प्रभाकर केदारी, अशोक नाईकवाडी,धनवटे सर, देशमुख सर,गुलाबराव कड,घोडेकर मॅडम,तसेच चाकण पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकातील महिला पोलीस वैशाली खंडागळे व अर्चना हाडवळे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत केदारी सर यांनी केले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
एकनाथ वाळुंज.
सचिव
फेस्कॉम, पुणे प्रादेशिक विभाग.

