सर्व फेस्काॅम बंधू भगिणींना आग्रहाचे निमंत्रण🙏

सर्व फेस्काॅम बंधू भगिणींना आग्रहाचे निमंत्रण🙏
येत्या जुलैच्या तेरा तारखेला सकाळी 11 वाजता नांदेड येथे फेस्काॅम अध्यक्ष मा.आण्णासाहे टेकाळेजी यांच्या नेतृत्वाखाली “लक्षवेधी मागणी महा पदयात्रेचा (मोर्च्याचा)नेम” केला जात आहे.
माझी आपणा सर्व सुज्ञ फेस्काॅम बंधूंना कळकळीची विनंती आहे की आपणही या सत्कार्यात तथा पूण्यकार्यात आपले योगदान नोंदवावे!
.

मित्रांनो आपण आज आहोत, ऊद्याला कुठे असू माहित नाही!आपण पुन्हा मनुष्य योनीतच जन्म घेऊत का? हेही माहित नाही!आपल्याला भगवंतानी न मागता खूप काही दिलेले आहे!आपण हे नाषवंत देह आणि जग सोडून जाताना रिकाम्या हातानी जाणार आहोत.आपल्या अंगावर कपडा तर सोडाच कंबरेचा करदोडा सुद्घा बरोबर येत नाही!
.
गरिब,गरजवंत,दूर्लक्षित,उपेक्षित, तथा वंचित शेतकरी,शेत मजूर,कष्टकरी,कामगार,विधवा माता आणि दिव्यांग हा ज्येष्ठ नागरिक समूह आपल्याकडे मदती साठी फार आशेनी बघत आहे! ते अत्यंत अर्थिक आडचणीत सापडलेले आहेत. आपण प्रयत्न केल्यास ईतर राज्या प्रमाणे त्यांना मानधन किंवा सन्मानधनासह रेंगाळलेले प्रश्न सोडवून दिल्यास उर्वरित आयुष्य ते समाधानाने जगतील!त्यांच्या चहर्‍यावर हस्य पहाता आल्यास त्याच्या सारखे पुण्यकर्म ते कोणते असेल?आनंद तो काय असेल?तेव्हा आपण सर्वानी गरिब-गरजवंत ज्येष्ठ नागरीकांसाठी एक दिवस काढावा ही विनंती!आपल्याला आपले गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिक बांधव झोपड पट्टी व ग्रामिण भागात कसे जगतात हे जवळून याची देही,याची डोळा अनुभव घेता येईल! फेस्काॅम सर्व ज्येष्ठ नागरिकासाठी आहे हे कळेल!आपण याव! येणार असाल तर आपली राहण्या खाण्या पिण्याची व्यवस्था आम्हाला करता येईल!👏
विनीतः-
डाॅ.हंसराज वैद्य.
प्रभाकर कुंटूरकर
गिरीष बार्‍हाळे