फेसकामचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी केलेल्या आव्हानानुसार शंभरी गाठलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करावा त्यानुसार दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागातील आलमला या गावी 97 वर्षाच्या कलावती परमु जडगे व रुक्मीनबाई शंकर जडगे या जुळ्या बहिणीचा घरी जाऊन फेसकामचे संघटक सचिव डॉक्टर बी. आर .पाटील ,प्रभाकर कापसे विरंगुळा व वृद्धाश्रम प्रमुख हरिभाऊ राठोड ,दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाचे सहसचिव व रावसाहेब पाटील औसा तालुका समन्वय समितीचे उपाध्यक्ष आणि शिवरुद्र धाराशिवे रामनाथ ज्येष्ठ नागरिक संघ आलमलाचे सदस्य यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दोन्ही माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असल्याचे निदर्शनास आले हा प्रसंग पाहून सर्वांचे अंतकरण हेलावले

