फेस्कॉम ४५ वा वर्धापन दिन

दिनांक 18 डिसेंबर रोजी फेस्कॉम चा सोहळा साजरा.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ “फेस्कॉम”चा 45 वा वर्धापन दिन व नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघाचा 34 वा वर्धापन दिन होता, दोन्ही संस्थांचा समारंभ एकत्र साजरा करण्याचा दुग्ध शर्करा योग 18 डिसेंबर रोजी नेरुळ मुख्यालयाच्या कार्यालयात जमुन आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेरुळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.चापके साहेब होते, फेस्कॉम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, श्री. विकास साठे, अध्यक्ष ज्ये.ना.संघ नेरुळ, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी हे प्रमुख पाहुणे होते, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री जयवंत पाटील. श्रीमती स्वातीताई फडके, श्री सुरेश पोटे. श्री. प्रभाकर गुमास्ते, श्री.क्षेत्रमाडे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कै.डॉक्टर राधाकृष्ण भट्ट व गुरुवर्य किंजवडेकर, यांना पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या वर्धापन दिनाचे प्रास्ताविक नेरुळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री विकास साठे, यांनी केले, त्यांनी नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघ करत असलेल्या कार्याची सर्वाना माहिती दिली, यासोबत या संस्थेचे सचिव श्री. अजय वाडेकर यांनी देखील बक्षीस वितरण समारंभा बाबत विस्तृत माहिती दिली. सर्व पारितोषिक विजेते यांचा प्रमुख पाहुणे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला, अत्यंत उत्साहात हा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.

डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी फेस्काॅमच्या कार्यशैलीची व सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

श्री.चापके साहेब यांनी फेस्काॅमच्या , आईस्कॉनच्या व नेरुळ संघाचे स्थापनेची विस्तृत माहिती दिली.

श्री नाईकवाडी यांनी जेष्ठांनी मोबाईल फ्रॉड मेसेज, ई-मेल यापासून सावध राहायला सांगितले कोणतेही कॉल घेऊ नये, सावध राहण्यास सुचविले.

सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणानंतर विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजय स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रगीत व सुग्रास भोजनांतर कार्यक्रमाची सांगता झाली.

सुरेश पवार

प्रवक्ता-प्रसिद्धी प्रमुख फेस्कॉम‌ महाराष्ट्र

22-12-2025

क्षणचित्रे.