फेस्कॉम ची डिजिटल भरारी, फेस्कॉम ची वेबसाईट

आज सर्व जग च डिजिटल युगात वावरत आहे, अशक्य हा शब्द काही दिवसात हद्दपार व्हावा, इतपत सर्व‌ चराचर सृष्टीत जवळीक निर्माण झाली आहे, करोडो वर्षांपूर्वी चे नाहीसे झालेले प्राणी सुद्धा, डिजिटली सजीव सारखे सदृश‌ भासमान वाटतात, पंचमहाभूतांची खेळी ही T.V वर पहाता येते, तद्वत दस्तऐवज डिजिटली तयार करून, चित्रफिती, प्रासंगिक चि‌त्र PDF मध्ये सुक्ष्म रुपांतरीत‌ करुन, कोणासही पाठवता येणे,‌ जपणूक करणे, हातातल्या “मोबाईल” खेळण्यात पहाता येते, सर्वच शक्य होत आहे…

ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने मोबाईल म्हणजे शिक्षण, म्हणजे नवयुगा़ची नांदी, Fescom Digital Academy (FDA ) च्या माध्यमातून फेस्कॉम महासंघाने, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटली सक्षम करण्याचा चंग बांधला, व तो फलदृपतेच्या दिशेने झेपावत आहे…

आपले अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे हे नवनवीन संकल्पना मांडून त्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात…
त्यांच्याच पुढाकाराने, फेस्काॅम “FDA” प्रमुख डॉ. वनिता ताई केळकर, वेबसाईट प्रमुख स्वातीताई फडके, सुनील आचरेकर. राजन फणसीकर. किरण मोरे रत्नाकर मानकर व तंत्रज्ञान प्रेमी महामुनी जी – यांनी त्याची एक झलक, चित्रफिती द्वारे सादर केली…

फेस्काॅम च्या स्थापनेपासून चा‌ गत ४४ वर्षाचा इतिहास चित्रफिती मध्ये बद्ध करण्या‌चा त्यांचा प्रयत्न, चल चित्रपटा प्रमाणे, सादरीकरण करणे, ही त्यांची कर्तृत्व शैली वाखाणण्याजोगी आहे…

प्राथमिक अवस्थेत असलेली वेबसाईट जेव्हा पूर्णत्वास जाईल, जेव्हा फेस्काॅम च्या इतिहासाचे एक एक पान‌ हळूवारपणे उलगडून दाखविले जाईल, तेव्हाच FDA टीमची चित्ताकर्षक मांडणी किती दर्जेदार आहे, याची प्रचिती आपणास जाणवेल …

फेस्काॅम म्हणजे काय याची संपूर्ण माहिती, कार्य, उद्देश, नियम, घटना, सभासद, एकूण संघ, प्रादेशिक विभाग, आजपर्यंत घेतलेल्या राज्यस्तरीय अधिवेशने, ठिकाणे, वर्ष, प्रसंगानुरूप फोटो, समग्र माहितीचा इतिहास नजरेपुढे झरझर सरकतो, हा अद्वितीय खेळ केवळ, फेस्कॉम‌च्या डिजिटली गरुडझेपेने प्रत्यक्षांत उतरवला आहे, थोड्याच दिवसात, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईल स्क्रीनवर अवतरणार आहे…
आज‌ १९/०४/२०२४ ला ज्येष्ठ नागरिकांची पंढरी “नेरूळ” ला, फेस्कॉम अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे. यांच्या अध्यक्षतेखाली फेस्काॅम ची त्रैमासिक मिटींग आयोजित करण्यात आली होती…
मिटींग मध्ये फेस्कॉम च्या प्रशंसनीय “लातूर राज्यस्तरीय अधिवेशन” आयोजकांचे सत्कार, आयोजनाचे मुख्य प्रवर्तक श्री. प्रकाशजी गादगिने. यांनी अधिवेशन काळातील घडामोडींचे लिखीत पुस्तकच फेस्काॅम ला दिले, व अधिवेशन ऑडिट पश्चात फेस्काॅम ला भरघोस देणगी मिळणार याची ग्वाही दिली…

मिटींग ला माजी अध्यक्ष श्री. अरुणजी रोडे, माजी आईस्कॉन प्रेसिडेंट श्री. चापके साहेब, उपाध्यक्ष श्री.अशोकजी तेरकर, मुख्य सचिव श्री. चंद्रकांतजी महामुनी, सह कार्यकारिणी सदस्य, प्रादेशिक विभाग अध्यक्ष, सह ७० जणांचा “फेस्काॅम परिवार” उपस्थित होता…
सुरेश पवार
२०/०४/२०२५

प्रवक्ता-प्रसिद्धी प्रमुख फेस्कॉम‌ महाराष्ट्र