फेस्काॅम चा४५ वा वर्धापनदिन

फेस्काॅम कोकण प्रादेशिक विभाग महिला समिती प्रमुख सौ विजया भानुदास शिंदे निमंत्रित यांचे बरोबर सुभाष मैदान ज्येष्ठ नागरिक संघाने आरोग्य शिबीर व सहल आयोजित करून साजरा केला. यात ५० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता . सकाळी ६.०० वाजता कल्याण हून प्रवास चालू झाला . आयोजकांनी ज्येष्ठांना नाश्ता, काॅफी देऊन उत्साहित केले .आणी बघता बघता आम्ही ९.०० वाजता माधवबागला पोहचलो . तेथे श्री पाटील यांनी ज्येष्ठांचे स्वागत करून गरम गरम नाश्ता, चहा काॅफी दिली . आनंदात निसर्गाच्या सान्निध्यात सर्व ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली . लेक्चर, विडिओ क्लिप पाहिल्यावर आरोग्याची काळजी घेणे याचे महत्त्व लक्षात आले .आनंदी वातावरणात सुग्रास जेवण ग्रहण करून माधवबागेतील आवश्यक स्थळांना भेट देऊन झाल्यावर यथोचित सन्मान करुन सर्वजण सहलीसाठी महड येथील गणपती दर्शनास रवाना झाले . तद्नंतर पळसदरी येथील स्वामी दर्शन घेऊन भक्तिरसात ज्येष्ठ न्हाऊन गेले . भजन म्हणून आनंदात परतीचा प्रवास सुरू केला . न भुतो न भविष्यतीअसा हा कार्यक्रम झाला . ज्येष्ठ तरुण खुश होते . या कार्यक्रमासाठी अध्यक्षा सौ सुनिता मोरणकर , उपाध्यक्ष श्री कोसुळकर , श्री फडके सर यांनी खूप श्रम घेऊन एका दिवसात भरगच्च कार्यक्रम केला खेळी मेळीच्या वातावरणात अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम झाला .असेच कार्यक्रम नित्य मंडळात व्हावेत हीच ईच्छा मी सौ विजया शिंदे फेस्काॅम कोकण प्रादेशिक विभाग महिला समिती प्रमुख पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते . सुभाष मैदान ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श संघ आहे.