१०७ वय असलेल्या श्रीमती राधाबाई यांचा फेस्कॉम तर्फे सत्कार.

गुरूवार दिनांक ०७/११/२०२४
पश्र्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग, अकोला – अमरावती
फेस्काॅम ने आव्हान केल्या प्रमाणे जसे आम्ही सोमवार दिनांक ४/११/२०२४ ला दोन शंभरी पार केलेल्या व्यक्तींचे सत्कार केले तसेच आमच्या भाग्यात आज १०७ वय असलेल्या श्रीमती राधाबाई गोविंदराव देशमुख यांचे दर्शन घेण्याचे योग जुळून आले.
फेस्काॅम चे माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री विनायकरावजी पांडे, पश्र्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग चे उपाध्यक्ष श्री नागोराव मोहोड, सहसचिव रमेश बाहेती, अकोला जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष श्री नारायणराव अंधारे, सदस्य श्री रामभाऊ बिरकड, श्री प्रमोद देशमुख, व अनंत अंधारे सगळे ॲड. श्री जाधव यांच्या घरी पोहोचलो ज्यांच्या सोबत राधामाई रहात आहेत. श्रीमती राधामाई सोबत त्यांची एकूलती एक मुलगी सुद्धा रहाते जिच वय आज मितीला ८३ वर्ष आहे.
राधामाई च वय १०७ असल्यावरही त्यांना कोणतीच बिमारी नाही. राधामाई ला बुका लाउन, ओवाळण्यातआले. शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ व लाडूने तोंड गोड करून शंख नादात सत्कार करण्यात आले. ॲड. जाधव यांना नकार दिल्या नंतरही त्यांनी फराळ, फळ खायला दिले वरून चहा आग्रहाने पाजला. राधामाई चे आशिर्वाद घेऊन आम्ही निरोप घेतला.