अंबाजोगाई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत व फेस कॉम च्या माध्यमातून 7000 संघ व वीस लाख सदस्य आहेत सर्व ज्येष्ठांना एकत्र आणण्याचे कार्य चालू आहेत. ज्येष्ठांचे अनेक प्रश्न आहेत फेस कॉम च्या माध्यमातून ते सोडवण्याचे प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी चालू आहेत. मागील काळात महात्मा फुले जन आरोग्य सारख्या योजनेमुळे ज्येष्ठांचे आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच ज्येष्ठांना प्रत्येक गावात विरंगुळा केंद्र निर्माण करणे व ज्येष्ठांच्या कल्याणकारी अनेक मागण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. असे उद्गार महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी अंबाजोगाई येथे झालेल्या ज्येष्ठांचे स्नेहसंमेलन 2025 च्या समारोप प्रसंगी काढले.
ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच ज्येष्ठांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. यात दिनांक पाच डिसेंबर ला सुरू होऊन ते14 डिसेंबर ला समारोप झाला या संमेलनात ज्येष्ठांच्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक भजन स्पर्धा ,गीत गायन स्पर्धा ,विविध गुणदर्शन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, स्मरणशक्ती सामान्य ज्ञान स्पर्धा शेलापागोटे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात तीनशेहुन जास्त ज्येष्ठांनी भाग घेतला.
ज्येष्ठांच्या स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड अनंतराव जगतकर होते तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस कॉम) अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून फेसकॉम चे सचिव चंद्रकांत महामुनी माजी अध्यक्ष अरुण रोडे, माजी मंत्री पंडितराव दौंड ,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी ,युवा नेते अक्षय मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य खडक भावी सर दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष दामोदर थोरात, प्रभाकर कापसे, अमृत टेकाळे हे होते.
या कार्यक्रमात दीड तासाचा ज्येष्ठांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात सरस्वती वंदना, राष्ट्रभक्तीपर समुहगीत, धनगर गीत, कोळीगीत, सामूहिक भावगीत, सामूहिक नृत्य,योगा नृत्य, यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दिगंबर राव साळुंखे, श्रीहरी नागरगोजे ,पुंडलिक बापू पवार ,दामोदर थोरात, सिंधुताई जोशी ,कमल बरुळे ,यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्नेहसंमेलनानिमित्त काढण्यात आलेली स्मरणिका दीपस्तंभ चे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमातस्नेहसंमेलनातील विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष अरुण रोडे , सचिव चंद्रकांत महामुनी,पंडितराव दौंड,अक्षय मुंदडा, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे ,दामोदर थोरात यांनी मार्गदर्शन केले. यात स्थानिक नेतृत्वांनी ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई चे कौतुक करून ज्येष्ठांना सर्वतो परी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
अध्यक्षीय समारोपात ज्या नगरपालिका ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करणार नाहीत त्यांचे अनुदान शासनाने रोखावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाई चे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड अनंतराव जगतकर यांनी व्यक्त केली..
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापकअध्यक्ष राधाकृष्ण भट यांच्या प्रतिमा पूजनाने व दिपप्रजननाने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जाजू , इदूमती पोटपल्लेवार यांनी प्रस्ताविक मंगला भुसा यांनी तर आभार प्रदर्शन सुलभा खेडगीकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी शिंदे, ज्ञानोबा कुकडे, दीपा स्वामी, पुष्पा बगाडे, समीर पटेल, आशा वाघमारे, ललिता पुजारी, नारायण केंद्रे, कोंडीबा राऊत , गणेश शिंदे, शिवकुमार निर्मळे ,मंगल लोखंडे, दिलीप स्वामी यांनी परिश्रम घेतले.

