“अवयव दान करणे म्हणजे मरूनही जिवंत राहणे होय.”…. डॉ. संतोष कुलकर्णी.
जिते जिते रक्तदान, जाते जाते अवयव दान!
और जाने के बाद नेत्रदान, अवयव दान”!
कुर्डूवाडी.. दि. 12/12/2025 रोजी कुर्डूवाडी ज्येष्ठ नागरिक संघ आणि इतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने फेस्कॉम (महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ) वर्धापन दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. प्रथमता “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना सामुदायिक रीत्या शंकरराव सुतार सरांनी घेतली. नंतर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, कुर्डूवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव भिसे, प्रभावती राजाभाऊ वागल इत्यादी ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या निधनामुळे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.अध्यक्षपदाची सूचना अशोक सुरवसे यांनी मांडली व त्याला अनुमोदन नलवडे साहेबांनी दिले. गणेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रमुख वक्ते माधवबाग शाखा बार्शी येथील सोमेश्वर कांबळे साहेबांचा परिचय प्रा.डॉ. पी बी शिंदे सरांनी करून दिला तर श्रीनिवास बागडे व डॉ. संतोष कुलकर्णी यांचा परिचय विठ्ठलमाई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किरण गोडसे साहेबांनी करून दिला.”सुदृढ हृदयाची गुरुकिल्ली”याविषयी सविस्तर माहिती माधवबागचे सोमेश्वर कांबळे साहेबांनी दिली. श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे सुद्धा त्यांनी दिली. अवयव दान व देहदान याचा संकल्प किती महत्त्वाचा आहे यामुळे अनेक गरजूंना जीवदान दिले जाते त्यांना नवजीवन प्राप्त होते. अशी महत्वपूर्ण माहिती महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास बागडे सरांनी सांगितली. एका व्यक्तीचे नेत्रदान हे दोन ते तीन व्यक्तींना दृष्टी देऊ शकते. अवयव दानामुळे अवयव दान करणारे व अवयव घेणारे दोन्ही व्यक्ती अतिशय आनंदित राहू शकतात. अशी नेत्रदान, अवयव दान, देहदान यावरील महत्वपूर्ण माहिती ज्येष्ठ नेत्र तज्ञ तथा आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी सांगितली. डॉ.संतोष कुलकर्णी यांनी अनेक उदाहरणे देऊन अवयव दान, नेत्रदान देहदान, याचे महत्व पटविले. व प्रत्येकाने अवयव दान करावे असे आवाहन त्यांनी केले. सदर प्रसंगी अवयव दान व देहदान करणाऱ्या पल्लवी दाभाडे या अपंग महिलेचा कुर्डूवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार करण्यात आला. आपण समाजामध्ये राहतो आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो देहदान आणि अवयव दान करून हे समाजऋण आपण फेडले पाहिजे. असे मनोगत पल्लवी दाभाडे यांनी केले. हनुमंत जगताप यांनी देहदानाचा तर संजय तुपारे व दशरथ कांबळे यांनी नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला. त्यांचाही सत्कार कुर्डूवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगराध्यक्ष बापूसाहेब क्षिरसागर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. म्हसोबा गल्ली, कुर्डूवाडी या ठिकाणी लवकरच नवीन महिला संघ निर्माण करण्याची घोषणा शंकरराव सुतार सरांनी केली. सत्कार समारंभ, आभार प्रदर्शन,व राष्ट्रगीतानंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रम संपला. सूत्रसंचालन अर्जुन गाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहिद शेख, रामचंद्र डांगे,विवेक वाघमारे, शाहू सोनवणे,अक्खतर खान, दशरथ कांबळे, संजय तुपारे, चुडाराम नगरे सर,भारत कांबळे, अनिल कापुरे, हनुमंत जगताप, सत्यवान जगताप, अरुण पवार, पोपट जंजिरे, मिलिंद चव्हाण, भारत चव्हाण, नवनाथ अवचर सर, माणिक आखाडे, सुनील तात्या शिंदे, सुबराव कांबळे,संजय जगताप, इत्यादींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
अध्यक्ष – गणेश व्यवहारे
सचिव – अर्जुन गाडे
कुर्डूवाडी ज्येष्ठ नागरिक संघ, कुर्डूवाडी

