फेस्कॉम “मनोयुवाची जबाबदारी” ऑनलाईन सभा उत्साहात संपन्न

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन.. अभिनंदन..आज दि १५-६-२०२५ रविवारी फेस्काम ची मनोहारी मनोयुवाची जबाबदारी संदर्भात ऑनलाइन सभा आयोजित करण्यात आली होती.त्यांत फेस्काम चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.फक्त यावल समाचार यावल जिल्हा जळगाव येथील संपादक श्री बाळकृष्ण वाणी यांचा एकमेव अर्ज आलेला होता.त्यांनी मी ते काम चांगल्या प्रकारे करु असे आश्वासन दिले. सर्वांनी यांचे अभिनंदन केले. सभेस मार्गदर्शन करतांना फेस्काम चे अध्यक्ष माननीय श्री आण्णासाहेब टेकाळे यांनी काम चांगले होण्यासाठी काही अटीची कल्पना दिली. त्या मला मान्य आहेत असे आश्वासन देऊन मी चांगल्या प्रकारे करण्याची प्रयत्न करु मात्र त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.अशा प्रकार मनोहरी मनोयुवा संपादकाची दीड महिन्यापासून असलेला गुंता माननीय अध्यक्ष श्री आण्णासाहेब टेकाळे , माजी अध्यक्ष श्री अरुण रोडे साहेब व इतर मान्यवरांच्या प्रयत्नांनी सुटला. फेस्काम खानदेश प्रादेशिक विभाग धुळे चे अध्यक्ष श्री बी एन पाटील यांनी ही आम्ही ही आमच्या परीने प्रयत्न व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शेवटी तोही आमच्या प्रादेशिक विभागाचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री बाळकृष्ण वाणी यांनी ते काम स्वीकारले.त्यांना फेस्काम खानदेश प्रादेशिक विभाग धुळे तर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन.. शुभेच्छुक श्री बी एन पाटील अध्यक्ष फेस्काम खानदेश प्रादेशिक विभाग धुळे