ज्येष्ठ महिलांच्या सबळीकरणासाठी फेस्कॉमची उल्लेखनीय कामगिरी – रश्मी नांदेडकर

पोलीस उपायुक्त,

नवी मुंबई आयुक्तालय.

फेस्कॉमच्या वतीने आयोजित केलेल्या महिला कार्यशाळेचे उद्घाटन करताना पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, यांनी गौरवोद्गार काढले. आज दिनांक २२-१२-२०२५ रोजी फेस्कॉमच्य महिला समितीच्या वतीने राज्यभरातील महिला संघांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई यांच्या शुभहस्ते करण्यात आले, ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेसकाॅम चे अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब टेकाळे हे होते , या कार्यक्रमाला ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, माजी महापौर मुंबई, या देखील हजर होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) चे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष श्री.अशोक तेरकर, आणि फेस्कॉमचे मुख्यालय उपाध्यक्ष श्री. विवेक देशपांडे, हे सुद्धा आमंत्रित होते. या कार्यक्रमासाठी माजी फेस्कॉम चे अध्यक्ष श्री. अरुण रोडे, हे सुद्धा पुण्याहून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मुंबई प्रादेशिक विभागाच्या रेखा भातखंडे, आणि उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्वाती फडके, हे मान्यवर सुद्धा हजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी अशा महाराष्ट्रातील गावागावातील महिला पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावून ह्या प्रकारची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल फेस्कॉमच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिला समितीकडे दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा कौतुक केले. नवी मुंबई पोलीस मुख्यालय हे नव्या मुंबईत ज्येष्ठ महिलांसाठी अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महिलांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. पोलीस खाते ह्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी राहणार आहे याची खात्री बाळगा असे महिलांना सांगितले.

प्रसिद्ध कायदेतज्ञ एडवोकेट निर्मला सावंत प्रभावळकर यांनी 2007 चा आई वडील पालण पोषण कायदा संदर्भात विस्तृतपणे महिलांना माहिती दिली त्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिली फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे ह्यांनी महिलांबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले.

“मिळुन सारया जणी”

“करुं फेसकाॅम ची उभारणी”

महिलांचे कार्य अखंडपणे सुरु असते, आता त्यांच्यासाठी आता कार्यशाळा घ्यावी, या विचाराने आम्ही ही कार्यशाळा आयोजित केली आहे. फेस्कॉमने महिलांचे आरोग्य, महिलांची सुरक्षितता आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य यासाठी फेस्कॉम आपले काम करत राहणार याची ग्वाही त्यांनी कार्यक्रमात दिली. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या फेस्कॉम महिला समिती अध्यक्षा मेजर निर्मला कोरे यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे स्वागत करताना आपले पूर्व अध्यक्ष श्री. अरुण रोडे यांच्या सूचनेप्रमाणे गाव तिथे संघ ऐवजी गाव तिथे महिला संघ तयार करण्याची शपथ घेऊया असे सर्वाना सांगितले. आपल्याला आपल्या असलेल्या संघात सुद्धा महिलांना मोठ्या संख्येने सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करुया.