ज्येष्ठ नागरिक भवन नेरुळ येथील उपक्रम



१) रुग्ण सेवा केंद्र – रुग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून गरजू आजारी व्यक्तीना निरनिराळ्या प्रकारची उपकरणे ३ महिन्याकरिता मोफत पुरविले जातात.

२) रुग्ण सेवा केंद्रा मार्फत दर गुरुवारी
मेमरी क्लिनिक सुरु करण्यात आले.


३) रुग्ण सेवा केंद्रा मार्फत दर गुरुवारी
ज्येष्ठांची दंत चिकित्सा केली जाते.


४) ज्येष्ठ नागरिक भवनात ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेमार्फत फिजियोथेरेपी सेंटर चालवले जाते. या इथे अगदी माफक दरात गरजूना फिजियोथेरेपी दिली जाते.


५) ज्येष्ठ नागरिक भवनात ज्येष्ठ नागरिकांमार्फत ग्रंथालय चालवले जाते. आज ह्या ग्रंथालयात जवळपास ८००० पेक्षा जास्त पुस्तके असून अनेक वाचक याचा लाभ
घेत आहेत.


६) ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ हे ज्येष्ठांना आनंद मिळावा म्हणून दर गुरुवारी
निरनिराळे कार्यक्रम व महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी त्या महिन्यात ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे केले जातात.


७) ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ तर्फे
दर वर्षी महिला दिन साजरा केला जातो आणि त्यादिवशी परिसरातील कर्तबगार स्त्रियांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित केले जाते.


) ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ यांनी दरवर्षी वृक्षारोपण करत पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी आपला सहभाग नोंदवतात.