
दिनांक २८/०१/२०१८ रोजी फेस्कॉमच्या विशेष सर्वसाधारण सभेने
मंजूर केलेली सुधारित घटना
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) चे ज्ञापन
१) नांव : ‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ’ असे आहे, ज्याला पुढे फेस्कॉम महाराष्ट्र (Federation of Senior Citizens Organisation of Maharashtra) असे संबोधिले आहे. सदरची संस्था पुढील तपशिलांत नमूद केलेल्या ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थापण्यात आली आहे.
२) नोंदणीकृत कार्यालय : फेस्कॉमचे नोंदणीकृत कार्यालय मुंबईत राहील, हे नोंदणीकृत कार्यालय मुंबईत ज्येष्ठ नागरिक भवन, जुनी गांवदेवी मंदिरामागे, सेक्टर १२, नेरुळ (पश्चिम) नवी मुंबई- ४००७०६ येथे राहील.
२.१ प्रशासकीय कार्यालय नियामक मंडळ निर्णय घेईल त्या ठिकाणी असेल, प्रशासकीय कार्यालय नोंदणीकृत कार्यालयातच वरील पत्त्यावर आहे.
२.२ प्रादेशिक विभागीय कार्यालये, जिल्ह्याचे ठिकाणी, तर स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघांची कार्यालये त्या त्या ठिकाणच्या विरंगुळा केंद्रात असावीत. जेथे ज्येष्ठ नागरिक संघांच्या मालकीच्या स्वतःच्या इमारती आहेत, तेथे हा नियम लागू असणार नाही. समन्वय समित्यांच्या कार्यालयांना हा नियम लागू राहील.
३) ध्येय व उद्दिष्टे : फेस्कॉमची ध्येये व उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
अंगीकृत उद्दिष्टे : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या आणि त्यांच्या संघांच्या समग्र कल्याणकारी उपक्रमांचे एका नेतृत्वाखाली एकीकरण व सुदृढीकरण करणे, आणि ज्येष्ठांचे बहुमोल ज्ञान आणि प्रगाढ अनुभव, प्रगल्भता, चैतन्य आणि कौशल्य, यांचा एकूण समाजाच्या, आणि विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उपयोग करुन घेणे.
३.१. समाजाचे आदरणीय व सन्माननीय सदस्य असल्याची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने निरनिराळ्या योजना व कार्यक्रमांचे माध्यमांतून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानाची प्रतिष्ठा व गुणवत्ता सुधारणे व यथास्थित ठेवणे.
३.२ वृद्धांच्या कल्याणात आणि / अथवा संबंधित वृद्धत्वविज्ञान, व वृद्धत्व रोग चिकित्सा, यांच्या सर्व शाखांमध्ये रस असणारे व त्याला समर्पित अशा सर्व संस्था व संघटना, क्लब, मंडळे यांना राज्य पातळीवरील एका संस्थेच्या छत्राखाली आणणे व त्यांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणे व सर्व बाबतीत त्यांचे हितसंबंधात समन्वय साधणे, एकस्तर करणे, वृद्धिंगत करणे व त्यांना संलग्न करुन घेणे.
३.३ ज्या – ज्या ठिकाणी अशा संघांच्या निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती अस्तित्वात असेल, अशा सर्व ठिकाणी वृद्धांच्या कल्याणाला समर्पित संघ/संस्था/क्लब/मंडळे स्थापन करण्यासाठी व चालविण्यासाठी आर्थिकसह सर्व मार्गानी व साधनांनी सहाय्य करणे.
KNOW MORE
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चिद दुःख भाग्भवेत् ।।
ॐ शान्तिः ॐ शान्तिः ॐ शान्तिः
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते ।
पुर्मस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते ।।
ॐ शान्तिः ॐ शान्तिः ॐ शान्तिः
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)
Our Presence
प्रादेशिक विभाग मुंबई (जिल्हे- नवी मुंबई व इतर उपनगरे )
प्रादेशिक विभाग कोकण (जिल्हे- ठाणे / रत्नागिरी/सिंधुदुर्ग/रायगड/पालघर)
प्रादेशिक विभाग, पुणे (जिल्हे- पूणे / सातारा / सोलापूर)
प्रादेशिक विभाग खानदेश (जिल्हे- जळगांव / धूळे/नंदूरबार)
५. प्रादेशिक विभाग, उत्तर मराठवाडा (जिल्हे- औरंगाबाद / जालना / नांदेड / हिंगोली)
प्रादेशिक विभाग, दक्षिण मराठवाडा (जिल्हे लातूर / उस्मानाबाद / बीड / परभणी)
प्रादेशिक विभाग, पश्चिम विदर्भ जिल्हे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम
प्रादेशिक विभाग,पूर्व विदर्भ (जिल्हे नागपूर / भंडारा / वर्धा)
प्रादेशिक विभाग, वनवैभव (जिल्हे- चंद्रपूर / गडचिरोली / गोंदिया)
प्रादेशिक विभाग, नाशिक (जिल्हा- नाशिक)
प्रादेशिक विभाग, अहिल्यानगर (जिल्हा- अहिल्यानगर)
प्रादेशिक विभाग, बुलढाणा (जिल्हा- बुलढाणा)
प्रादेशिक विभाग, कोल्हापूर (जिल्हा कोल्हापूर)
प्रादेशिक विभाग, सांगली (जिल्हा सांगली)
काहीअविस्मरणीय क्षण…



























LATEST NEWS & UPDATES
सरकारला अतिवृष्टीसाठी रु .१५.५९ लक्ष चा निधी सुपूर्द केला
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी मोठे नैसर्गिक संकट कोसळले असून शासन आपल्या परीने त्यांना…
फेस्काॅम चा४५ वा वर्धापनदिन
फेस्काॅम कोकण प्रादेशिक विभाग महिला समिती प्रमुख सौ विजया भानुदास शिंदे निमंत्रित यांचे बरोबर सुभाष…
“सत्कार ज्येष्ठांचा”
नांदेडदि. 5 नोव्हेंबर रोजी श्री बाबाराव दिघे पाटील वय१०१वर्षे सौ.रूक्मिणी दिघे पाटील वय ९५ वर्षे…
शंभरी गाठलेल्या ज्येष्ठांचा सन्मान
फेसकामचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी केलेल्या आव्हानानुसार शंभरी गाठलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करावा त्यानुसार दक्षिण मराठवाडा…
“अंधत्वाकडुन दृष्टिकडे मुक्त अभियान”
“जुन २०१६ पासुन अखंड सेवा “नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस येथे जुन २०१६ पासुन प्रत्येक…
फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) अध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे, मुंबई विभाग अध्यक्ष सुरेश पोटे व सदस्य…










